त्र्यंबकेश्वर मंदिर १८ एप्रिलपर्यंत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 00:21 IST2021-04-05T19:56:21+5:302021-04-06T00:21:01+5:30
त्र्यंबकेश्वर : शहरासह तालुक्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे त्र्यंबकेश्वर मंदिर १८ एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय देवस्थानने घेतला आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर १८ एप्रिलपर्यंत बंद
त्र्यंबकेश्वर : शहरासह तालुक्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे त्र्यंबकेश्वर मंदिर १८ एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय देवस्थानने घेतला आहे.
जवळपास आठ महिन्यांपासून कमी-अधिक प्रमाणात कोरोनाने कहर मांडला आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान प्रशासनाने ह्यदेऊळबंदह्णचा निर्णय घेतला आहे. सध्या परगावचे यात्रेकरू ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे ५ ते १८ एप्रिलपर्यंत भाविकांसाठी ह्यदेऊळबंदह्ण करण्यात आलेले आहे. तथापि देवाच्या पारंपरिक तिन्ही त्रिकाल पूजा नैवेद्य चालूच राहतील. यात खंड पडणार नाही. विशेष म्हणजे रविवारी दि.१८ नंतर दैनंदिन परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.