त्र्यंबकेश्वर तालुक्यात जोरदार पाउस एका रात्रीत 135 मिमि पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 18:17 IST2019-07-07T18:16:19+5:302019-07-07T18:17:05+5:30

त्र्यंबकेश्वर : आतापर्यंत रिपरिप पावसाबद्दल शेतक-यांची ओरड असतांना एका रात्रीत 155 मि.मि.पावसाची नोंद करु न त्र्यंबकेश्वर शहरात दाणादाण उडवली आहे. गावात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. रस्त्यावरु न उंच असलेल्या गोदा स्लॅबवर कमरे एवढे पाणी होते. स्लॅबवर असलेली भाजी मंडई अन्य व्यावसायिकांनी आपले धंदे बंद ठेवले होते. त्यांच्या भाजीच्या पाट्या सुरिक्षत ठिकाणी नेण्यासाठी त्यांची धांदल उडाली.

In Trimbakeshwar taluka, heavy rainfall recorded 135 mm rain in one night | त्र्यंबकेश्वर तालुक्यात जोरदार पाउस एका रात्रीत 135 मिमि पावसाची नोंद

त्र्यंबकेश्वर तालुक्यात जोरदार पाउस एका रात्रीत 135 मिमि पावसाची नोंद

ठळक मुद्देशहरात घराघरात पाणी; डोंगरावरु न वाहणारे धबधबे वेगात; चौरापाडा येथे बैल पुरता वाहुन गेला.

त्र्यंबकेश्वर : आतापर्यंत रिपरिप पावसाबद्दल शेतक-यांची ओरड असतांना एका रात्रीत 155 मि.मि.पावसाची नोंद करु न त्र्यंबकेश्वर शहरात दाणादाण उडवली आहे. गावात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. रस्त्यावरु न उंच असलेल्या गोदा स्लॅबवर कमरे एवढे पाणी होते. स्लॅबवर असलेली भाजी मंडई अन्य व्यावसायिकांनी आपले धंदे बंद ठेवले होते. त्यांच्या भाजीच्या पाट्या सुरिक्षत ठिकाणी नेण्यासाठी त्यांची धांदल उडाली.
गावातील गोदावरी निलगंगा म्हातार ओहळ व गावा बाहेरु न वाहणारी अिहल्या नदी आदींमुळे सर्व प्रवाह तुडुंब भरु न वाहत आहेत. गावातील लक्ष्मीनारायण चौक कुशावर्त चौक मेनरोड तेलीगल्ली डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक नगरपालिका अमृतकुंभ धर्मशाळा आदी ठिकाणी गुडघा भर कमरे इतके पणी वाहत होते. यावर्षी पावसाळी गटारी गंगापात्र स्वच्छ न केल्यामुळे थोडक्यात पावसाळ्यापुर्वी करावयाच्या गटारी गंगापात्र नगरपालिकेने साफ न केल्यामुळे गोदापात्राचे पाणी वरती आले.
सद्आय पता मात्र पुनश्च रिमझिम पडत आहे. अधुन मधुन विश्रांति घेत आहे. विशेष म्हणजे दोन दिवसा आड मिळणारे पाणी आता किमान एक दिवसाआड सुरु होण्याची अपेक्षा आहे. तसे पालिका रोज देखील पाणी सोडु शकेल पण आता येणारे पाणी गढुळ असेल तरी जनतेने पालिकेला समजुन घ्यावे असे आवाहन स्विप्नल (पप्पु) शेलार यांनी केले आहे.
त्र्यंबकेश्वर अव्याहत पणे पावसाच्या सरी कोसळत आहे. पण पुनर्वसु पावसाने मात्र कमाल केली आहे. डोंगरावरन वाहणारे धबधबे वेगात खाली कोसळत आहे.
त्र्यंबकेश्वर पाउस आता सुरु झाला आहे. सुदैवाने फक्त पाउसच आहे. जोरदार वारे नाहीत. तरीही तालुक्यात किरकोळ स्वरु पात भिंतींची पडझड झाली आहे.
तालुक्यातील चौरापाडा येथील नदीच्या पुरात एक बैल वाहुन गेला आहे. अद्याप बैलमालकाचे नाव कळाले नाही. सद्य परिस्थितीत पुनश्च पाउस सुरु झाला आहे.

Web Title: In Trimbakeshwar taluka, heavy rainfall recorded 135 mm rain in one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस