त्र्यंबकेश्वरला डोंगरच्या काळी मैनाचे बाजात आगमन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 22:32 IST2019-05-09T22:32:18+5:302019-05-09T22:32:52+5:30
त्र्यंबकेश्वर : येथक्षल बाजारपेठेत परिसरातील डोंगर दऱ्यातील निसर्गाचे देणं असलेल्या डोंगरच्या काळी मैनाचे अर्थात करवंदांचे (कोकणी द्राक्ष)े आगमन झाले आहे. आंबट-गोड चव असलेली करवंदे स्थानिकांसह येथे येणाºया यात्रेकरु ची पसंती आहे.

त्र्यंबकेश्वरला डोंगरच्या काळी मैनाचे बाजात आगमन !
त्र्यंबकेश्वर : येथक्षल बाजारपेठेत परिसरातील डोंगर दऱ्यातील निसर्गाचे देणं असलेल्या डोंगरच्या काळी मैनाचे अर्थात करवंदांचे (कोकणी द्राक्ष)े आगमन झाले आहे. आंबट-गोड चव असलेली करवंदे स्थानिकांसह येथे येणाºया यात्रेकरु ची पसंती आहे.
त्र्यंबकेश्वर शहरात अशा जंगली फळांमध्ये कैºया, रायवळ आंब,े तोरणे करवंदे, आवळे, जांभळे, चिंचा, विलायती चिंचा आदी फळांचा हंगाम जानेवारी ते जुन या दरम्यान असतो. वास्तविक या फळांची कोणाला लागवड करायची अगर मशागतीची गरज नसते. ही फळे अक्षरश: निसर्गाच्या कृपाशिर्वादाने आपोआप येतात व रु जतात. कालपरत्वे दरवर्षी फळे देतात. यातील प्रत्येक फळांपासुन काहीना काही आयुर्वेदिक गुणधर्म असतात.
दरम्यान ही फळफळावळे सध्या मुबलक प्रमाणात मिळतात. आणि त्यांना मागणीही मोठ्या प्रमाणात असते. ही जंगली फळे मिळवतांना अगर विक्र ीसाठी आणावयाची म्हटली तरी एक प्रकारची जोखीम पत्करावी लागते. करवंदाची जाळी मोठी असली तरी संपुर्ण काटेरी व दाट असते. या जाळीत वाघाचे वास्तव्य असते. अनेकांच्या जळणाचे साधन देखील असते.
चौकट.....
जांभुळ जसे जांभळीच्या बिया मधुमेहावर गुणकारी असतात. आवळे पौरुषत्वावर व डोक्याच्या केसांसाठी गुणकारी तसेच आवळां पासुन मोरावळा, आवळा पाक पचनाला उपयुक्त असतो. चिंचा कोणत्याही पदार्थांची चव वाढविण्यासाठी उपयुक्त असतात. यासाठी चिंचेचा कोळ आदी तयार केलेली असते. आंब्यापासुन मुरांबा रु चकर लोणचे आदी करतात. कच्च्या करवंदाचे लोणचे देखील चवदार असते. आदी गुणधर्म या पदार्थांमध्ये असतात.
(फोटो ०९ त्र्यंबक करवंद)