संत गाडगेबाबा यांना कसबेसुकेणेत आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 15:40 IST2020-12-20T15:40:29+5:302020-12-20T15:40:58+5:30
कसबे सुकेणे : निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबांनी त्यांचे संपुर्ण आयुष्य रंजल्या गांजलेल्यांसाठी समर्पित केले, गावोगावी कीर्तनातून स्वच्छतेचा जागर करणारे संत गाडगेबाबा हे लोकशिक्षक व स्वच्छता अभियानाचे खरे जनक असल्याचे प्रतिपादन उपसरपंच धनंजय भंडारे यांनी व्यक्त केले .

संत गाडगेबाबा यांना कसबेसुकेणेत आदरांजली
कसबे सुकेणे ग्रामपालिका व मराठा -परिट समाज सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपालिका कार्यालयात संत गाडगेबाबा यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी धनंजय भंडारे, छबु काळे, रमेश जाधव, सुनिल गोतरणे,प्रकाश धुळे, सुहास भार्गवे, शांताराम धुळे, योगेश सगर, अनिल रणशिंगे, राजेंद्र रणशिंगे, सागर रणशिंगे , ललित सगर , नाना घोडेराव यांनी प्रतिमा पूजन केले.