हरसूल येथे आदिवासी दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:19 IST2020-08-10T22:30:05+5:302020-08-11T01:19:59+5:30
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : हरसूल येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आदिवासी संस्कृतीचे दर्शन पहायला मिळाले.

हरसूल येथे आदिवासी दिन
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : हरसूल येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आदिवासी संस्कृतीचे दर्शन पहायला मिळाले. हरसूलमध्ये जिल्हा नियोजन समिती सदस्य व इंजिनिअर विनायक माळेकर, जिल्हा परिषद सदस्य रूपांजली माळेकर, मिथुन, राऊत, हिरामण गावीत, बाळा चौधरी यांच्या हस्ते बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विविध भागातील आदिवासी युवावर्ग, विविध आदिवासी संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा अबलंब करत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले.