कलियुगात आदिवासी बांधवांनी आपली संस्कृती जपण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 21:27 IST2021-10-17T21:26:24+5:302021-10-17T21:27:02+5:30
सटाणा : कलियुगात आदिवासी बांधवांनी आपली संस्कृती जपण्याची नितांत गरज असून, एकलव्याने अंगठा दिला होता, आजच्या काळात अंगठ्याची जपवणूक करण्याची गरज आहे. आपली संस्कृती जोपासून सर्वच क्षेत्रांत आदिवासी समाजातील तरुणांनी प्रगती साधली पाहिजे आणि राजकारणात सर्वच ठिकाणी चांगल्या सुसंस्कृत प्रतिनिधींना पाठविण्यासाठी एकजुटीने राहिले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक मातापित्यांना आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन कलियुगातला एकलव्य तयार केला पाहिजे, असे मत आमदार दिलीप बोरसे यांनी व्यक्त केले.

येथील देवमामलेदार यशवंतराव महाराज सभागृहात आदिवासी एकता परिषदेच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एकता परिषदेचे संस्थापक सचिव डोंगर बागुल होते. आदिवासी समाजाने व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवता सरकारी दवाखान्याचा आधार घेणे आज काळाची गरज असल्याचे जिल्हा परिषद सदस्य रेखा पवार यांनी सांगितले.
आदिवासी समाजाचा खरा इतिहास आजपर्यंत पुढे न आल्यामुळेच खरा इतिहास काय आहे ते समजले नाही. त्यासाठी प्रत्येकाने आदिवासींचा इतिहास समजून घेण्याची गरज असल्याचे अध्यक्षस्थानावरून बोलताना बागुल म्हणाले.
या वेळी महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख सुनील गायकवाड, युवा राष्ट्रीय अध्यक्ष प्रेमचंद सोनवणे, जिल्हा सचिव राजेंद्र माळी, केंद्रीय आंदोलन समितीचे सदस्य कैलास पवार यांची भाषणे झाली. कार्यक्रम यशस्वितेसाठी एकता युवा जिल्हाध्यक्ष साहेबराव आहिरे, तालुकाध्यक्ष सुरेश जाधव, शहराध्यक्ष बाळासाहेब बागुल, उपशहराध्यक्ष सचिन पवार, उपतालुका अध्यक्ष अनिल गायकवाड, नंदू शिंदे, रवि पवार, अनिता माळी यांनी परिश्रम घेतले.