त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या मंडपावर झाड कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 17:11 IST2019-08-01T17:11:02+5:302019-08-01T17:11:45+5:30
नुकसान : पूर्व दरवाजावरील दर्शन रांग बंद

त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या मंडपावर झाड कोसळले
त्र्यंबकेश्वर : येथील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या पूर्व दरवाजाच्या दर्शन रांगेवरील वॉटरप्रुफ मंडपावर नजीकचे झाड कोसळल्याने मंडपाचे नुकसान झाले आहे. दर्शन रांगेत गर्दी कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे पूर्व दरवाजावरील दर्शन रांग बंद करण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वर परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून संततधार सुरू आहे. पावसामुळे त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वॉटरप्रुफ मंडपावर जवळच असलेले झाड कोसळले. त्यात मंडपाचे नुकसान झाले. त्र्यंबकेश्वर देवस्थान हे पुरातत्व विभागाच्या कार्यक्षेत्रात असल्याने याठिकाणी बांधकामास मनाई आहे. न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत पुरातत्व विभागाकडून दर्शन बारीचे बांधकाम करण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे देवस्थानकडून भाडेतत्वावर अथवा ठेकेदारीने मंडप उभारणीचे काम केले जाते. मागील वर्षी या मंडपासाठी देवस्थान ट्रस्टने सुमारे ११ लाख रुपये मोजल्याचे सांगितले जाते. यंदाही मंडप उभारणीसाठी ठराव झालेला आहे. दरम्यान, पावसामुळे सदर झाड कोसळले. सुदैवाने, दर्शन रांगेत गर्दी कमी असल्याने मोठा अनर्थ टळला.