शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी भागात वृक्ष कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 01:18 IST

गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे झाडांचे बुंधे भिजल्याने वृक्षांची पडझड सुरू झाली आहे. पंचवटीत पेठरोडवर सोमवारी सकाळी करंज वृक्ष कोसळला, तर दुपारी प्राचीन सीतागुंफा संस्थानजवळ वटवृक्षाची एक फांदी पत्र्यावर वाकली. सुदैवाने या दोन्ही घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पंचवटी : गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे झाडांचे बुंधे भिजल्याने वृक्षांची पडझड सुरू झाली आहे. पंचवटीत पेठरोडवर सोमवारी सकाळी करंज वृक्ष कोसळला, तर दुपारी प्राचीन सीतागुंफा संस्थानजवळ वटवृक्षाची एक फांदी पत्र्यावर वाकली. सुदैवाने या दोन्ही घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. भाविकांना रांगेने उभे राहता यावे यासाठी तयार केलेल्या निवारा शेडवर फांदी आल्याने दुर्घटना टळली.पंचवटी अग्निशमन दल व उद्यान विभागाच्या वतीने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पेठरोडला वृक्ष, तर सीतागुंफा संस्थानजवळ निवारा शेडवर वाकलेली फांदी बाजू काढण्यात आली. दुपारी घडलेल्या घटनेनंतर सीतागुंफा संस्थांमध्ये काहीकाळ भाविकांना दर्शन बंद केले होते. पेठरोड सिग्नल नजीक करंज वृक्ष असून, सोमवारी सकाळी बुंध्यापासून वृक्ष उन्मळून पडला. सकाळी वर्दळ कमी असल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सीतागुंफा संस्थानजवळ असलेल्या वड, पिंपळ वृक्षाच्या फांद्या वाकून निवारा शेडवर आल्याने त्या कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. सदर घटना नागरिकांच्या लक्षात येताच तत्काळ अग्निशमन दल व उद्यान विभागाला माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन व उद्यान विभागाच्या कर्मचारी- अधिकाऱ्यांनी धाव घेत वट व पिंपळाच्या फांद्या बाजूला काढण्याचे काम केले. याच परिसरात वीजतारा असल्याने वाकलेल्या वृक्षाच्या फांद्या काढण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने फांद्या बाजूला काढण्याचे काम केले. वृक्षाच्या वाकलेल्या फांद्या काढण्याचे काम सुरू असताना काहीवेळ रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता.जिल्हाधिकाऱ्यांच्या घरावर पडले झाडशहरात रविवारी (दि.२८) सहा ठिकाणी झाडे पडली. त्यात जिल्हाधिकाºयांच्या निवासस्थानीदेखील एक झाड पडल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. सोमवारी (दि.२९)देखील सहा झाडे पडलीत त्यात त्र्यंबकरोडवर शासकीय वसतिगृहावरदेखील एक झाड पडले. शहरात धोकेदायक वृक्षांची पडझड सुरूच असून, महापालिकेने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक