इगतपुरी तहसील कार्यालयात कोषागार दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 17:33 IST2021-02-02T17:32:09+5:302021-02-02T17:33:30+5:30
इगतपुरी : येथील उपकोषागार कार्यालयात राष्ट्रीय कोषागार दिन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.

इगतपुरी येथे राष्ट्रीय कोषागार दिनानिमित्त कार्यक्रमप्रसंगी तहसीलदार परमेश्वर कासुळे, प्रवीण गोंडाळे, दिनेश पाडेकर, अण्णासाहेब भडांगे यांसह उपस्थित मान्यवर.
इगतपुरी : येथील उपकोषागार कार्यालयात राष्ट्रीय कोषागार दिन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
व्यासपीठावर नायब तहसीलदार प्रवीण गोंडाळे, दिनेश पाडेकर, उपकोषाधिकारी अण्णासाहेब भडांगे, तांत्रिक सहायक सुनयना पगारे, मुद्रांक विक्रेते अध्यक्ष सूर्यभान पढेर, उपलेखापाल शाम बोराडे, पुरवठा अव्वल कारकून मोहिनी पगारे, सामाजिक कार्यकर्ते राजू देवळेकर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांचे स्वागत उपकोषागार अधिकारी अण्णासाहेब भडांगे व तांत्रिक सहायक सुनयना पगारे यांनी केले. यावेळी मुद्रांक विक्रेते विजय शेलार, मदन लहाने, भाऊसाहेब कोकणे, भास्कर जाखेरे, अरुण गतिर, संदीप पाटेकर, मारुती चव्हाण, बाळासाहेब पढेर, विष्णू कोकणे, शिवनाथ पढेर, चंद्रकला वाजे, सतिष कर्पे, निवृत्ती कोकणे, जालिंदर मानवेढे उपस्थित होते.