शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गप्रेमींसाठी साकारला माहितीचा खजिना!

By admin | Updated: November 16, 2016 22:56 IST

निफाड : नांदूरमधमेश्वर बंधाऱ्याजवळील खानगाव थडी येथील निसर्ग निर्वचन केंद्र

निफाड : देश-परदेशातील पक्ष्यांची एकत्रित माहिती जिथे बघायला मिळते ते निसर्ग निर्वचन केंद्र निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्याजवळील खानगाव थडी येथे गोदावरीकाठी उभारण्यात आले आहे.नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यावर दरवर्षी देश-परदेशातून विविध पक्षी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यादरम्यान लाखोंच्या संख्येने येत असतात. हे पक्षी पाहण्यासाठी देशातून पर्यटक येथे असतात. या विविध पक्ष्यांबद्दलची सर्व माहिती येथील गाइड देत असतात. मात्र पर्यटकांना पक्ष्यांबद्दल, नांदूरमधमेश्वर बंधाऱ्याबद्दल सखोल माहिती चित्र रूपाने व्हावी, या उद्देशाने खानगाव थडी येथे नांदूरमधमेश्वर बंधाऱ्याच्या पूर्वेला वन्यजीव विभाग नाशिकच्या वतीने एक एकर जागेत निसर्ग निर्वचन केंद्र उभारण्यात आले आहे. या ठिकाणी भव्य इमारत उभारण्यात आली आहे. या केंद्रात दोन मोठे स्वतंत्र हॉल असून, प्रत्येक हॉलमध्ये नांदूरमधमेश्वर बंधारा, त्याचा इतिहास, क्षेत्र या विषयी माहिती देण्यात आली आहे. तसेच दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यादरम्यान देश- परदेशातून येणारे विविध जातीचे पक्षी, त्यांची उत्पत्ती, त्यांचे नाव, भौगोलिक स्थान याविषयी सर्व माहिती चित्र रूपाने या केंद्रात मांडण्यात आली आहे. नांदूरमधमेश्वर बंधारा परिसरात आढळणारे बिबटे, तरसे साप व इतर प्राणी यांचीही माहिती या केंद्रात चित्ररूपाने लावण्यात आली आहे. काही पक्ष्यांच्या मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. शिवाय वृक्षावर काही पक्ष्यांची घरटीसुद्धा साकारण्यात आली आहे. पक्षी, पक्ष्यांच्या चोचीचे प्रकार, त्यांचे पाय, त्यांची पचन संस्था आदि माहिती चित्ररूपाने मांडण्यात आली आहे. या केंद्रात आलेल्या पर्यटकांना २० मिनिटांचा माहितीपट दाखविण्यात येतो. हा माहितीपट बघताना आपण जणू नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यावर आहोत आणि त्या बंधारा परिसरात वावरणारे विविध पक्षी जवळून बघत आहोत असा भास होतो. नांदूरमधमेश्वरबंधारा, त्याचा जलाशय, या बंधाऱ्यावर येणारे देश- विदेशातील विविध जातीचे पक्षी याबाबत सर्व सखोल माहिती या लघुपटात दाखविण्यात आली आहे. (वार्ताहर)