शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

वन्यजीव संवर्धनासाठी 'ट्रान्सिट ट्रिटमेंट सेंटर' ठरणार मैलाचा दगड : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2021 5:06 PM

जखमी वन्यप्राण्यांची शुश्रुषा करणे संकटात सापडलेल्या वन्यजीवांना आपला जीव धोक्यात घालून ह्यरेस्क्यूह्ण करणे, वणवे रोखणे, जंगलातील तस्करी रोखणे, असे सर्व काम वनखात्याकडून केले जाते व हे अत्यंत धोकादायक व जोखमीचे आणि तितकेच जबाबदारीचे काम

ठळक मुद्देवन्यजीव उपचार केंद्राच्या वास्तूचे म्हसरुळला भूमिपूजनउत्तर महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प

नाशिक : सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या निधीतून वन्यप्राण्यांसाठी सुसज्ज असे रुग्णालय नाशकात साकारले जात आहे, याचा आनंद आहे. हे उत्तर महाराष्ट्रातील वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे, कारण जसा माणसांचा जीव तसा वन्यप्राण्यांचाही जीव महत्त्वाचा आहे. वन्यप्राणी, पक्षी, कीटक हे सर्व जैवविविधतेमधील घटक सृष्टीचा एक भाग आहे. त्यामुळे पृथ्वी टिकविण्यासाठी सृष्टी जगविणे महत्त्वाचे असून हे त्याच्याच दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.जागतिक वन्यजीव सप्ताहचे औचित्य साधत या उपचार केंद्राच्या बांधकामाचे भूमिपूजन भुजबळ यांच्या हस्ते सोमवारी (दि.४) करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर, उपवनसंरक्षक पंकज गर्ग, तुषार चव्हाण, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, सहायक वनसंरक्षक गणेश झोळे, भरत शिंदे, आनंद रेड्डी, ठेकेदार मंदार ठाकूर आदी उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्रातील पहिले वन्यप्राणी उपचार केंद्र (ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटर) नाशिक पश्चिम वनविभागाच्या वतीने जिल्हा नियोजन समितीने पुरविलेल्या निधीद्वारे म्हसरुळ शिवारातील वन विभागाच्या आगारात सुमारे दोन एकर जागेत उभारले जाणार आहे.यावेळी भुजबळ म्हणाले, जखमी वन्यप्राण्यांची शुश्रुषा करणे संकटात सापडलेल्या वन्यजीवांना आपला जीव धोक्यात घालून ह्यरेस्क्यूह्ण करणे, वणवे रोखणे, जंगलातील तस्करी रोखणे, असे सर्व काम वनखात्याकडून केले जाते व हे अत्यंत धोकादायक व जोखमीचे आणि तितकेच जबाबदारीचे काम आहे. यावेळी भुजबळ यांनी वनविभागाने प्रदर्शित केलेल्या रेस्क्यू साधनसामुग्रीची माहिती वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांच्याकडून जाणून घेतली. प्रास्ताविक गर्ग यांनी केले. सूत्रसंचालन वनक्षेत्रपाल मनीषा जाधव यांनी केले व आभार झोळे यांनी मानले.

--असे असेल उपचार केंद्रकेंद्रात वन्यप्राणी शस्त्रक्रिया कक्ष, अतिदक्षता विभाग, एक्स-रे कक्ष, निरीक्षण कक्ष, औषधे, खाद्यपदार्थ भांडारगृह यासाठी बिबट्याकरिता आठ अद्ययावत असे ऐसपैस प्राणी संग्रहालयाप्रमाणे मोठे आठ पिंजरे, वाघासाठी दोन पिंजरे, तरस, कोल्हे, लांडग्यांसाठी पाच पिंजरे, तसेच या सर्व वन्यप्राण्यांना सुरक्षितरीत्या वावरता यावे यासाठी संवर्धन परिसरासह काळवीट, हरीण, माकड, वानरांसाठी प्रत्येकी दोन पिंजरे उभारले जाणार आहे.पक्ष्यांच्या जखमांवरही फुंकरजखमी वन्यप्राण्यांसह पक्ष्यांच्याही वेदनांवर या केंद्रात उपचाराची फुंकर घातली जाणार आहे. मोरासाठी एक स्वतंत्र पिंजरा, तर गिधाडासारख्या अन्य पक्ष्यांसाठी सात स्वतंत्र युनिट बांधण्यात येणार आहे. यामध्ये पक्ष्यांसाठी उड्डाण चाचणी युनिट असणार आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांसाठीसुद्धा प्रत्येकी एक युनिट असणार आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिकwildlifeवन्यजीवenvironmentपर्यावरणChagan Bhujbalछगन भुजबळ