शहरातील पोलीस उपआयुक्तांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 01:08 IST2019-07-16T01:08:01+5:302019-07-16T01:08:23+5:30
पोलीस आयुक्तालयातील प्रशासन विभागाच्या पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे यांची नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. तसेच राज्य पोलीस नियंत्रण कक्षाचे पोलीस अधीक्षक विजय खरात यांची पोलीस आयुक्तालयात कांगणे यांच्या रिक्त जागेवर उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरातील पोलीस उपआयुक्तांच्या बदल्या
नाशिक : पोलीस आयुक्तालयातील प्रशासन विभागाच्या पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे यांची नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. तसेच राज्य पोलीस नियंत्रण कक्षाचे पोलीस अधीक्षक विजय खरात यांची पोलीस आयुक्तालयात कांगणे यांच्या रिक्त जागेवर उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच नाशिक ग्रामीणच्या मालेगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची नागपूर शहरात उपायुक्तपदी बदली झाली. त्यांच्या रिक्त जागी संदीप घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अकादमीमधील उपसंचालक नंदकुमार ठाकूर यांची बृहन्मुंबई येथे पोलीस उपायुक्तपदी बदली झाली आहे. तसेच पदोन्नतीने जयश्री देसाई यांची पोलीस अकादमी येथे नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकच्या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या उपायुक्तपदी सोलापूरचे सहायक पोलीस आयुक्त रमेश चोपडे यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सोलापूर ग्रामीणवरून आलेले चंद्रकांत खांडवी यांची महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.
आगामी विधानसभा
आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबर महिन्यात लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाकडून सहायक आयुक्त, उपअधीक्षक, उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत.