पेसाअंतर्गत बदली शिक्षकांना आदिवासी क्षेत्रातच पदस्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 01:38 AM2019-09-16T01:38:30+5:302019-09-16T01:38:53+5:30

जिल्ह्यात पदस्थापना पेसा तसेच अनुसूचित क्षेत्रातील शिक्षक म्हणून आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांसह स्थानिक आदिवासी शिक्षकांनाही अनुसूचित तथा पेसा क्षेत्रातच पदस्थापना देण्याचे आदेश ग्रामविकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले आहेत.

The transfer of teachers under the profession to the tribal area | पेसाअंतर्गत बदली शिक्षकांना आदिवासी क्षेत्रातच पदस्थापना

पेसाअंतर्गत बदली शिक्षकांना आदिवासी क्षेत्रातच पदस्थापना

Next
ठळक मुद्देग्रामविकास विभाग : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश

नाशिक : जिल्ह्यात पदस्थापना पेसा तसेच अनुसूचित क्षेत्रातील शिक्षक म्हणून आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांसह स्थानिक आदिवासी शिक्षकांनाही अनुसूचित तथा पेसा क्षेत्रातच पदस्थापना देण्याचे आदेश ग्रामविकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले आहेत.
यात नाशिकसह राज्यातील ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, नांदेड, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली या तेरा जिल्ह्यांचा समावेश असून, अशाप्रकारे पदस्थापना न झालेल्या शिक्षकांची यादी तयार करण्याच्या सूचनाही कक्ष अधिकाºयांनी दिल्या
आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आंतरजिल्हा बदलीप्रक्रियेच्या पहिल्या, दुसºया व तिसºया टप्प्यात पेसा तथा अनुसूचित क्षेत्रातून बदलून आलेल्या, मात्र सर्वसाधारण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांना पेसा क्षेत्रात स्थापित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.
रिक्त जागांची यादी करण्याच्या सूचना
आंतरजिल्हा बदलीने स्थानिक आदिवासी म्हणून आलेल्या, परंतु पदस्थापना न मिळालेल्या स्थानिक आदिवासी शिक्षकाचाही यात समावेश करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पवित्रप्रणालीद्वारे पेसा क्षेत्रातील उमेदवाराची यादी प्राप्त झाली असल्यास तिचाही ज्येष्ठतेनुसार समाविष्ट पदस्थापना न झालेल्या शिक्षकांच्या यादीत समावेश करावा. त्यानंतर पेसा क्षेत्रात शिक्षकांची पदस्थापना झाल्यानंतर बिगर पेसा क्षेत्रातील व पेसा क्षेत्रातील रिक्त जागांचीही यादी तयार करण्याच्या सूचना कक्ष अधिकारी सं. ना. भडारकर यांनी दिल्या आहेत.

Web Title: The transfer of teachers under the profession to the tribal area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.