येवला येथे भाजपा कार्यकर्त्यांना शिबिराद्वारे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 00:38 IST2020-12-02T21:47:33+5:302020-12-03T00:38:59+5:30

येवला : तालुक्याती तांदूळवाडी येथे भारतीय जनता पार्टी ग्रामीण कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.

Training of BJP workers through camp at Yeola | येवला येथे भाजपा कार्यकर्त्यांना शिबिराद्वारे प्रशिक्षण

येवला येथे भाजपा कार्यकर्त्यांना शिबिराद्वारे प्रशिक्षण

ठळक मुद्दे समारोप खासदार डॉ. भारती पवार यांचे उपस्थित

येवला : तालुक्याती तांदूळवाडी येथे भारतीय जनता पार्टी ग्रामीण कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.
श्रीराम पॅलेस सभागृहात झालेल्या या शिबीरात पहिल्या सत्रात मनोज दिवटे, नितीन पांडे, तुषार वाघमारे, सुनील बच्छाव, संजय गाजरे, नितीन जाधव यांनी पक्ष संघटना, विकास, ध्येय धोरणे आदींबाबत मार्गदर्शन केले. समारोप खासदार डॉ. भारती पवार यांचे उपस्थित झाला. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपाचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले पाहिजे त्यासाठी तयारीला लागा असे आवाहन खासदार पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी आनंद शिंदे, तालुका अध्यक्ष डॉ. नंदकुमार शिंदे, तालुका संघटन सरचिटणीस नानासाहेब लहरे, सरचिटणीस दत्ता सानप, संतोष काटे, युवा तालुकाध्यक्ष संतोष केंद्रे, गोरख खैरनार, मिननाथ पवार, यांनी परिश्रम घेतले.
शिबिरास केदारनाथ वेलणकर, सखाहरी लासुरे, केशव देशमुख, गंगा गोंधळी, महेश देशमुख, संतोष मुथा, निवृत्ती भोसले, संजय जाधव, बाळासाहेब शिंदे, सचिन पोटे, संगीता दिवटे, महेश देशमुख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Web Title: Training of BJP workers through camp at Yeola