अंगावर गाडी घालून युवकास मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:38 IST2019-06-26T00:37:07+5:302019-06-26T00:38:05+5:30
कारचे नुकसान का केले, अशी विचारणा करण्याचा राग आल्याने युवकाने इनोव्हा गाडी अंगावर घालून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंगावर गाडी घालून युवकास मारण्याचा प्रयत्न
नाशिकरोड : कारचे नुकसान का केले, अशी विचारणा करण्याचा राग आल्याने युवकाने इनोव्हा गाडी अंगावर घालून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंदनगर गुरूदर्शन अपार्टमेंट येथील नीता संजय भावसार यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, गेल्या १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता (एमएच १२, डीएस ४८१६) चारचाकी सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी होती. यावेळी सोसायटीत राहणारा वीरतन साहेबराव आहिरे व त्याच्या मित्रांनी गाडीला ओरखडे मारून नंबर प्लेट तोडून नुकसान केले. याबाबत नीता भावसार व त्यांचा मुलगा विचारणा करण्यास गेले असता वीरतन व त्याची बहीण सुप्रिया यांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे़ गेल्या २१ जून रोजी रात्री १० वाजता सोसायटीखाली जोरजोरात बोलण्याचा आवाज येत असल्याने नीता व त्यांचे पती संजय भावसार हे बघण्यास गेले असता वीरतन आहिरे याने त्याच्या ताब्यातील इनोव्हा कार (एमएच १५, एफएम २७६३) संजय भावसार यांच्या अंगावर नेल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.