नाळे येथे दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:41 IST2018-09-12T00:41:30+5:302018-09-12T00:41:49+5:30

मालेगाव तालुक्यातील नाळे येथे दोन गटात मारहाण झाली असून, दोन्ही गटांनी परस्परविरोधात दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलिसात दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

The tragedy in the two groups at the Nala | नाळे येथे दोन गटांत हाणामारी

नाळे येथे दोन गटांत हाणामारी

मालेगाव : तालुक्यातील नाळे येथे दोन गटात मारहाण झाली असून, दोन्ही गटांनी परस्परविरोधात दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलिसात दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी सकाळी हा प्रकार घडला.
छायाबाई पुंडलिक कोते व गोकुळ नानाजी कोते दोन्ही रा. नाळे यांनी पोलिसात परस्परविरोधात फिर्याद दिली. छायाबाई कोते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिने व तिच्या सोबतच्या साक्षीदारांनी गोकुळ कोते यांच्या घरासमोरून तुम्ही माझे पती पुंडलिक कोते यांना मारहाण का केली अशी विचारणा केली असता त्याचा राग येवून गोकुळ कोते याने काठीने फिर्यादीच्या पतीला मारहाण केली. त्याच्या साथीदारांनी दगडाने फिर्यादीच्या डोक्यावर मारून दुखापत केली तर अन्य चौघांनी फिर्यादीच्या मुलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याचा दम दिला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. गोकुळ कोते याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, छायाबाई कोते व तिच्या सोबतच्या चार जणांनी फिर्यादीच्या घरासमोर येवून आम्ही आमच्या म्हशी चरण्यासाठी सोडल्यानंतर तू आडवा का येतो असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली. त्याच्या सोबतच्या दोघांनी फिर्यादीस लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. छायाबाईने दगड उचलून फिर्यादीचे वडील व पत्नी यांच्या डोक्यावर मारुन जखमी केले.



दोन जणांनी फिर्यादीची मुलगी व मुलगा यांना शिवीगाळ व मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा दम दिला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस नाईक तांदळे व बच्छाव करीत आहेत.

Web Title: The tragedy in the two groups at the Nala