नाशिकमध्ये महाशिवरात्रीला रामकुंडावरील वाहतूक बंद, भाविकांची गर्दी पाहता प्रशासनाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 16:04 IST2025-02-25T16:04:01+5:302025-02-25T16:04:23+5:30
कपालेश्वर मंदिर, पंचवटी कारंजा, ढिकले वाचनालय, सदरदार चौक-काळाराम मंदिर या मार्गाने मिरवणुका काढण्यात येणार आहेत.

नाशिकमध्ये महाशिवरात्रीला रामकुंडावरील वाहतूक बंद, भाविकांची गर्दी पाहता प्रशासनाचा निर्णय
नाशिक : रामकुंड परिसरातील कपालेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची गर्दी पाहता वाहतुकीस मज्जाव करण्यात आला आहे. बुधवारी (दि.२६) पहाटे पाच ते रात्री १२ वाजेपर्यंत रामकुंडावर येणाऱ्या वाहनांचा प्रवेश नसेल.
कपालेश्वर मंदिर, पंचवटी कारंजा, ढिकले वाचनालय, सदरदार चौक-काळाराम मंदिर या मार्गाने मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक बंद असेल. हातगाड्या, बैलगाड्या, सायकल, मोटार सायकल, मोटार गाड्या व इतर सर्व प्रकारच्या वाहनांना या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.
या मार्गावरील वाहतूक बंद
ढिकले सार्वजनिक वाचनालयाकडून कपालेश्वर मंदिराकडे जाणारी वाहतूक बंद असेल. मालेगाव स्टॅण्डकडून कपालेश्वर मंदिराकडे, सरदार चौकाकडून कपालेश्वर मंदिराकडे जाणारी, गाडगे महाराज पुलाकडून कपालेश्वर मंदिराकडे येणारी, महाराष्ट्र आयर्न वर्क्सकडून खांदवे सभागृहाकडे जाणारी तसेच मालवीय चौकाकडून खांदवे सभागृहाकडे जाणारी वाहतूक बुधवारी दिवसभर बंद असेल.