हरसूल घाटात झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 18:42 IST2019-08-03T18:41:38+5:302019-08-03T18:42:26+5:30
मुसळधार पावसामुळे हरसूल घाटात झाड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली. महत्त्वाचा समजला जाणारा हा रस्ता वाहतूक ठप्प झाला आहे.

वाघेरा घाटातील रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक बंद.
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : मुसळधार पावसामुळे हरसूल घाटात झाड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली. महत्त्वाचा समजला जाणारा हा रस्ता वाहतूक ठप्प झाला आहे. हरसूल भागात मोठा दवाखाना आहे व हरसूल, त्र्यंबकेश्वर व नाशिकला जोडण्यासाठी हरसूल रस्ता हाच एकमेव मार्ग असून, शुक्र वारी शाळेला गेलेले शिक्षक व कर्मचारी हरसूलकडे अडकून पडले. बोंबीलटेक येथील पाड्यावर अंबोली धरणातून येणाऱ्या नदीमुळे ये-जा करण्याºया रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने तेथील मार्ग खंडित झाला होता. विद्यार्थी व नागरिक यांना पाण्यातून मार्ग काढत असताना मोठा त्रास सहन करावा लागला. हेदुलीपाडा, वरसविहीर, खरवळ येथील रस्त्याची स्थिती ही पावसाने खराब झाल्याने बस सेवा खंडित झाली. काही ठिकाणी रस्त्यावर माती आल्याने रस्ता बंद झाला आहे.