मुंबई नाका ते गडकरी चौक दरम्यान ट्रॅफिक जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 01:32 IST2021-03-13T01:32:07+5:302021-03-13T01:32:27+5:30

शुक्रवारी सायंकाळी शहरातील अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. विशेषत: गडकरी चौक ते मुंबई नाका दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचप्रमाणे अशोकस्तंभ, सीबीएस आणि शालिमार चौकातही काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाली. 

Traffic jam between Mumbai Naka to Gadkari Chowk | मुंबई नाका ते गडकरी चौक दरम्यान ट्रॅफिक जाम

मुंबई नाका ते गडकरी चौक दरम्यान ट्रॅफिक जाम

ठळक मुद्देमुंबई नाका येथे शुक्रवारी सायंकाळी ७नंतर वाहनांची अचानक कोंडी झाल्याने अशी रांग लागली होती.

नाशिक : शुक्रवारी सायंकाळी शहरातील अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. विशेषत: गडकरी चौक ते मुंबई नाका दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचप्रमाणे अशोकस्तंभ, सीबीएस आणि शालिमार चौकातही काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाली. 
शनिवार आणि रविवार दोन दिवस बंद राहणार असल्यामुळे नाशिककर खरेदीसाठी घराबाहेर पडल्यामुळेच वाहतूक कोंडी झाली असावी असेही बोलले जात आहे. 
अनेक दुकानांसमोर रस्त्यांवरच चारचाकी वाहने उभी करण्यात आल्याने मुख्य रस्त्यावरील वाहनांना अडथळा निर्माण झाला. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली. अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस पोहचू न शकल्याने वाहने कोंडीत अडकून पडली. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Web Title: Traffic jam between Mumbai Naka to Gadkari Chowk