वाहतूक कोंडीचे खापर मनपाच्या माथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:13 IST2020-01-20T23:39:44+5:302020-01-21T00:13:49+5:30
मनपाचे चौक, ट्रॅफिक वॉर्डनची कमतरता आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने शहरात वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाल्याचे पोलीस आयुक्तांनी ठामपणे सांगितल्याने शहरातील बेशिस्त वाहतुकीला जबाबदार कोण? असा प्रश्न आता पोलीस आयुक्तांच्या भूमिकेमुळे उभा राहिला आहे.

वाहतूक कोंडीचे खापर मनपाच्या माथी
नाशिक : मनपाचे चौक, ट्रॅफिक वॉर्डनची कमतरता आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने शहरात वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाल्याचे पोलीस आयुक्तांनी ठामपणे सांगितल्याने शहरातील बेशिस्त वाहतुकीला जबाबदार कोण? असा प्रश्न आता पोलीस आयुक्तांच्या भूमिकेमुळे उभा राहिला आहे.
नियोजन समितीमध्ये शहरातील पोलीस यंत्रणेच्या सादरीकरण दरम्यान पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी वाहतूक कोंडीला केवळ पोलीस यंत्रणा जबाबदार नाही तर शहराच्या नियोजनदेखील असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले.
१९ लाख लोकसंख्येच्या नाशिक शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी केवळ अडीचशे वाहतूक पोलीस पुरेसे नाहीत. ट्रॅफिक वॉर्डन देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला तर सिग्नलवरी यंत्रणा सुरळीत करता येऊ शकेल. एकट्या द्वारका चौकात सहा वाहतूक पोलीस द्यावे लागतात याकडेदेखील लक्ष वेधले.
शहरात रिक्षांची आवश्यकता केवळ १२ हजारांपर्यंतच आहे, परंतु २३ हजारांपेक्षा अधिक रिक्षा धावतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने नागरिकांना आपली वाहने वापरावी लागतात, असा दावा पोलीस आयुक्तांना केला आहे.
वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या कोंडीला मनपाचे नियोजन जबाबदार असल्याकडेच पोलीस आयुक्तांनी बोट दाखविले.
उपाययोजना करण्याची सूचना
सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी वाहतूक सुरक्षिततेसबाबतचा मुद्दा उपस्थित करताना स्मार्ट सिटीतून सुरक्षिततेसाठीच्या उपायोजना करण्याचीदेखील सूचना केल्याने महापालिकेनेच आता वाहतूक नियंत्रणाची जबादारी पार पाडावी असा अर्थ त्यातून काढला जात असेल तर मग पोलीस यंत्रणा नेमके काय करणार अशी चर्चा होऊ लागली आहे.