नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने द्वारका चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी अवजड वाहनांना प्रवेश बंद तर समांतर रस्त्यांवरील वाहतूक एकेरी केली. यामुळे द्वारका चौकात होणारी कोंडी कमालीची कमी झाली असली तरी, अंतर्गत रिंगरोडसह त्याच्या उपनगरीय जोड रस्त्यांवर वाहतुकीचा ताण अधिक वाढल्याचे चित्र आहे. हा ताण कमी करण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडे असलेले मनुष्यबळ अपुरे पडत असल्याचे चित्र आहे.
द्वारका चौकातील वाहतूक कोंडीचा गुंता सैल होऊ लागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 17:19 IST
द्वारकेच्या वाहतूक कोंडीवर मात करता यावी यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अवजड वाहनांसह बागवानपुरा रस्ता, अनधिकृत रिक्षा, बस थांबे, समांतर रस्ते, एकेरी वाहतूक यासंदर्भात तीन दिवसांपूर्वीच अधिसूचना काढली.
द्वारका चौकातील वाहतूक कोंडीचा गुंता सैल होऊ लागला
ठळक मुद्देजादा पोलिसांची नियुक्ती वाहतूक शाखेला करावी लागणार कोंडी ब-यापैकी सुटल्याने नागरिकांमध्ये समाधानशहर वाहतूक शाखेकडे असलेले मनुष्यबळ अपुरे