बोगद्यातील पाण्याने रहदारी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 16:53 IST2020-09-16T16:51:11+5:302020-09-16T16:53:51+5:30
येवला : मनमाड-दौड रेल्वे मार्गावर असलेले येवला तालुक्यातील धामोडे गावाजवळ नगरसुल- सावरगाव रस्त्यावरील रेल्वे गेट बंद करून रेल्वे विभागाने बोगदा (अंडरपास) केला आहे. पावसाने या बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने परिसरातील ग्रामस्थांची रहदारी बंद झाली आहे.

बोगद्यातील पाण्याने रहदारी बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : मनमाड-दौड रेल्वे मार्गावर असलेले येवला तालुक्यातील धामोडे गावाजवळ नगरसुल- सावरगाव रस्त्यावरील रेल्वे गेट बंद करून रेल्वे विभागाने बोगदा (अंडरपास) केला आहे. पावसाने या बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने परिसरातील ग्रामस्थांची रहदारी बंद झाली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात या बोगद्यात पाणी साचत असल्याने जाण्या-येण्याची खूप गैरसोय होते. याबाबत वेळोवेळी संबंधीतांकडे स्थानिक ग्रामस्थांनी तक्र ारी केल्या परंतु या तक्र ारींची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. रस्त्याअभावी दवाखान्यात उपचारासाठी सुध्दा या भागातील नागरिकांना जाता येत नाही.
दरम्यान, दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी या प्रश्नी तातडीने लक्ष घालून ग्रामस्थांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते विनोद पाटील आदींनी केली आहे.