पारंपरिक वादनाने ‘तबला चिल्ला’त रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:30 IST2019-01-13T00:30:02+5:302019-01-13T00:30:56+5:30
ताल त्रितालात पारंपरिक पेशकार, कायदे, रेले, तुकडे आदी विविध तबलावादन प्रकारांसोबतच पंधरा मात्रांचा पंचम सवारी, एकल तबलावादन, तसेच पारंपरिक गत, चक्रधार या रचनांच्या सादरीकरणांनी तबला चिल्लाच्या दुसऱ्या दिवसांत रंगत भरली.

पारंपरिक वादनाने ‘तबला चिल्ला’त रंगत
नाशिक : ताल त्रितालात पारंपरिक पेशकार, कायदे, रेले, तुकडे आदी विविध तबलावादन प्रकारांसोबतच पंधरा मात्रांचा पंचम सवारी, एकल तबलावादन, तसेच पारंपरिक गत, चक्रधार या रचनांच्या सादरीकरणांनी तबला चिल्लाच्या दुसऱ्या दिवसांत रंगत भरली.
कुसुमाग्रज स्मारकात आदिताल तबला अकादमीतर्फे सुरू असलेल्या तबल्ला चिल्लामध्ये शनिवारी (दि.१२) नाशिककरांना पारंपरिक दिग्गजांच्या रचनांसह विविध तालांच्या सादरीकरणाची मेजवानी अनुभवण्यास मिळाली. सकाळच्या सत्राची सुरुवात सौरभ ठकार याच्या वादनाने झाली. त्याने पारंपरिक ताल तीनतालाचे वादन करताना उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर मुंबईच्या तनय रेगे याने पंधरा मात्रांचा पंचम सवारी ताल सादर केला, तर अथर्व वारे याने सादर केलेल्या त्रितालातील एकल वादनालाही रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. सकाळच्या सत्राचा समारोप इंदौरचे हितेंद्र दीक्षित यांच्या त्रिताल वादनाने झाला. या सत्रात सर्व तबलावादकांना गुरू गांधी पुष्कराज भागवत व ज्ञानेश्वर सोनवणे यांनी हार्मोनिअमने साथसंगत केली.
तीन तालातील रंगत
सायंकाळच्या सत्रात मुंबईचा ईशान घोष याने तीनतालातील पारंपरिक वादनाने सुुरुवात केली. त्यांनी पारंपरिक बंदिशींसोबतच गत, तुकडे, रेले सादर केले. वनराज शास्त्री यांनी सारंगीसह, प्रतीक सिंग यांनी हार्मोनियमने संगीतसाथ केली. हे सत्र यशवंत वैष्णव यांच्यानंतर अरविंद आझाद यांच्या तबलावादन रंगले. त्यांना गुरू गांधी व पुष्कराज भागवत यांनी संगीतसाथ केली. अरविंद आझाद यांच्या वादनाने दुसºया दिवसाचा समारोप झाला.