शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

यंदा चांदोरी येथील पारंपरिक बोहाडा उत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 9:41 PM

चांदोरी : येथे दरवर्षी बोहडा उत्सव साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोना पाशर््वभूमीवर या वर्षी हा उत्सव रद्द करण्यात आला असल्याचा निर्णय उत्सव पंचकमिटी व स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा परिणाम : भाविकांचा हिरमोड; पावसासाठी केले जाते आर्जव

लोकमत न्यूज नेटवर्कचांदोरी : येथे दरवर्षी बोहडा उत्सव साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोना पाशर््वभूमीवर या वर्षी हा उत्सव रद्द करण्यात आला असल्याचा निर्णय उत्सव पंचकमिटी व स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.अंदाजे तीनशे वर्षांपासून बोहडा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यामध्ये विविध देव देवता, राक्षसाचे सोंग घेऊन संबळ, पिपाणीच्या गजरात नृत्य केले जाते. गोदावरी काठी असलेल्या चांदोरी या गावातील बोहडा उत्सवाला अनेक पैलू लाभलेले आहेत. ऐतिहासिक समजला जाणारा हा उत्सव यंदा रद्द केल्याने बोहडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. पर्जन्याच्या आर्जवासाठी ग्रामीण भागात पूर्वी आखाडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे. यामध्येनिसर्गाशी संबंधित अनेक देव-देवतांचे मुखवटे व वेश परिधान करून पारंपरिक वाद्य असलेले संबळ व पिपाण्यांच्या तालावरती मिरवणूक काढली जाते. काठीला कापड बांधून तयार केलेल्या मशाली (टेंभे) पेटवून त्या उजेडात सकाळ होईपर्यंत ही सोंगे नाचवली जातात. कागदाचा लगदा व जंगली झाडपाला वापरून देव-दानवांचे मुखवटे तयार केलेले असतात. शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सोंगे काढली जातात. गणपती, सरस्वती, मच्छ-राक्षस, मारुती-जंबुमाळी, त्रिपुरासूर-शंकर, त्राटिका-राम लक्ष्मण, खंडेराव-दैत्य, वेताळ-विक्र मराजा, एकादशीदेवी-राक्षस, भस्मासूर-मोहिनी, इंद्रजीत-लक्ष्मण, रक्तादेवी-राक्षस, गजासूर-शंकर, भीमा-जरासंध, रावण-राम लक्ष्मण, वीरभद्र-दक्षप्रजापती, नरसिंह-हिरण्यकश्यपू अशा सोंगांची मिरवणूक काढली जाते. त्यानंतर जगदंबा व महिषासुराच्या युद्धात त्याचा वध करून विजयी जगदंबा देवीची मिरवणुकीने यात्रेची सांगता होते. मात्र, या वर्षी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी हा उत्सव रद्द करण्यात आल्याचे चांदोरी येथील पंचकमिटी व गाव प्रशासनाने सांगितले.कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून या वर्षी आखाडी (बोहडा) उत्सव रद्द करण्यात आला आहे. बोहडाप्रेमींचा यंदा हिरमोड झाला असून, पुढील वेळी मोठा उत्सव जलोषपूर्ण वातावरणात साजरा करू.- देवराम निकम, बोहडा संयोजक, चांदोरी

टॅग्स :nifadनिफाडgram panchayatग्राम पंचायत