सप्तशृंगगडावर कीर्तिध्वजाची परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 22:30 IST2020-04-07T22:29:57+5:302020-04-07T22:30:11+5:30
वणी : सप्तशृंगगडावरील शिखरावर कीर्तिध्वज फडकविण्याची परंपरा ध्वजाचे तीन मानकरी व यजमान यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आली. सप्तशृंगगडावर सुमारे ...

सप्तशृंगगडावर कीर्तिध्वजाची परंपरा कायम
वणी : सप्तशृंगगडावरील शिखरावर कीर्तिध्वज फडकविण्याची परंपरा ध्वजाचे तीन मानकरी व यजमान यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आली.
सप्तशृंगगडावर सुमारे ५०० वर्षांपासून परंपरा असलेल्या चैत्र पौर्णिमेस कीर्ती ध्वजारोहण सोहळा प्रतिवर्षी साजरा होतो,
मात्र यंदा १४ एप्रिलपर्यंत कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन घोषित करण्यात आल्याने सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक कार्यक्र म रद्द करण्यात आले आहेत. त्या आदेशाचे पालन करून सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टने ध्वजाचे तीन मानकरी व यजमान अशा मोजक्याच लोकांनी उपस्थित राहत ध्वजाची विधिवत पूजा केली. ध्वजपूजन व ध्वजारोहणासाठी आदेशाचे पालन करण्यात येऊन परंपरेचा मान राखण्यात आला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे यांनी दिली.