पर्यटकांच्या नोंदी ठेवण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:37 IST2019-07-01T00:36:33+5:302019-07-01T00:37:03+5:30
पावसाळ्यात पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांनी उपाययोजना करूनच बाहेर पडणे अपेक्षित असले तरी, यंदा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी, तहसीलदार व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पर्यटकांच्या नोंदी ठेवण्याच्या सूचना
पावसाळ्यात पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांनी उपाययोजना करूनच बाहेर पडणे अपेक्षित असले तरी, यंदा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी, तहसीलदार व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पर्यटनासाठी ज्या ठिकाणी पर्यटक येतील त्या त्या भागातील ग्रामपंचायतीने याबाबतीत विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी पर्यटनासाठी येणाºया विशेष करून गड, किल्ले, ट्रेकिंग ठिकाणे, धबधबा, दरी अशा धोकादायक ठिकाणी जाणाºया पर्यटकांची नावे, संपर्क क्रमांकाच्या नोंदी ठेवल्या जाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित ग्रामपंचायतीने अशा धोकादायक ठिकाणी स्थानिक स्वयंसेवकांच्या नियुक्त्या करणे अपेक्षित आहे.
नो सेल्फी झोनची अंमलबजावणी
पावसाळ्यात पर्यटनाकडे कल वाढला आहे. भ्रमणध्वनीवर सेल्फी घेण्यासाठी जीव धोक्यात घालण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यंदा पर्यटन विभागाने पर्यटन स्थळे, धबधबे अशा ठिकाणी नो सेल्फी झोनचे फलक लावून त्याची अंमलबजावणी करण्याची उपाययोजना केली आहे.