देवळ्यात हल्लाबोल यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 22:29 IST2018-02-18T22:26:21+5:302018-02-18T22:29:35+5:30

देवळा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचे देवळा तालुक्यातील पांच कंदील परिसरात स्थानिक पदाधिकाºयांकडून स्वागत करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, प्रदेश अध्यक्ष आमदार सुनील तटकरे, जयंत पाटील, राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार आदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह हल्लाबोल यात्रेचे देवळा येथील पाच कंदील परिसरात आगमन झाले. माजी आमदार शांताराम अहेर यांनी यात्रेचे स्वागत केले.

Tourism in Devni | देवळ्यात हल्लाबोल यात्रा

देवळ्यात हल्लाबोल यात्रा

ठळक मुद्देराष्टÑवादी कॉँग्रेस : पाच कंदील परिसरात पदाधिकाºयांकडून स्वागतभाजपाचे कार्यकर्ते पंडित देवमन निकम, नगरसेविका बेबी नवरे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात

देवळा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचे देवळा तालुक्यातील पांच कंदील परिसरात स्थानिक पदाधिकाºयांकडून स्वागत करण्यात आले.
खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, प्रदेश अध्यक्ष आमदार सुनील तटकरे, जयंत पाटील, राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार आदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह हल्लाबोल यात्रेचे देवळा येथील पाच कंदील परिसरात आगमन झाले. माजी आमदार शांताराम अहेर यांनी यात्रेचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक जितेंद्र अहेर, भरत देवरे, दादा बस्ते, भाजपाचे कार्यकर्ते पंडित देवमन निकम, नगरसेविका बेबी नवरे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी माजी आमदार शांताराम अहेर, राकाँचे तालुकाध्यक्ष पंडित निकम, मविप्र संचालक विश्राम निकम, जि. प. सदस्य नूतन अहेर, यशवंत सिरसाठ, बाजार समितीचे संचालक योगेश अहेर, उमराणा बाजार समितीचे अध्यक्ष राजेंद्र देवरे, जिल्हा सरचिटणीस जगदीश पवार, खुंटेवाडीचे सरपंच भाऊसाहेब पगार, उषा बच्छाव, नीलिमा अहेर, नगरसेवक लक्ष्मीकांत अहेर, अनंत आहिरराव, नारायण रणधीर, डॉ. संजय निकम, सुनील पाटील, डॉ. साहेबराव सोनजे, चंद्रकांत पाटील, जिभाऊ वाघ, पोपट पगार, नाना मोरे, सतीश सूर्यवंशी, भिला सोनवणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Tourism in Devni