चाकूचा धाक दाखवून युवतीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:52 IST2019-05-15T00:51:49+5:302019-05-15T00:52:45+5:30

कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने युवतीशी ओळख करून संशयित नराधमाने चाकूचा धाक दाखवून घरात घसून युवतीवर बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित तुषार पांडुरंग शिंदे यास ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Torture on a young woman by threatening knife | चाकूचा धाक दाखवून युवतीवर अत्याचार

चाकूचा धाक दाखवून युवतीवर अत्याचार

सिडको : कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने युवतीशी ओळख करून संशयित नराधमाने चाकूचा धाक दाखवून घरात घसून युवतीवर बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित तुषार पांडुरंग शिंदे यास ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिडको परिसरातील संभाजी चौकात राहणाऱ्या २१ वर्षीय युवतीसोबत मोबाइल विक्रीच्या माध्यमातून दुकानदार तुषार याने ओळख केली. या ओळखीचा फायदा घेत संशयित तुषार याने कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने बळजबरीने तिच्या घरात जाऊन चाकूचा धाक दाखवत वेळोवेळी अत्याचार केले. संशयित सदर युवतीच्या आईलाही मारहाण करीत होता. त्याचा त्रास वाढल्याने अखेर पीडित युवतीने अंबड पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी
तक्रारीवरून संशयित तुषार शिंदे याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सविता गवांदे करीत आहे.

Web Title: Torture on a young woman by threatening knife