आता ‘वरचे’च तिकीट बाकी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 00:58 IST2019-10-05T00:57:02+5:302019-10-05T00:58:12+5:30
निवडणुका आल्यानंतर पक्षातील अनेकजण उमेदवारीसाठी तयारी सुरू करतात. जमेल त्या मार्गाने उमेदवारीसाठी गळ घालतात आणि नेत्यांच्या भेटीगाठी घेतात.

आता ‘वरचे’च तिकीट बाकी...
निवडणुका आल्यानंतर पक्षातील अनेकजण उमेदवारीसाठी तयारी सुरू करतात. जमेल त्या मार्गाने उमेदवारीसाठी गळ घालतात आणि नेत्यांच्या भेटीगाठी घेतात. त्यातल्या त्यात भाजप हा केडर बेस पक्ष आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे अनेक निष्ठावान कार्यकर्ते वर्षानुवर्षे पक्षात काम केल्याची पावती मागतात आणि त्यांना कोणतीही उमेदवारी मिळत नाही. त्यात काही महिला कार्यकर्त्याही असतात. पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांना त्या सतत हजर असतात. परवाकडे मुंबईत पक्षाची उमेदवारी ठरत असल्याने भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात मोठी गर्दी होती. त्यातच एका कार्यकर्त्याने थट्टेने सतत डावलल्या जाणाऱ्या महिला कार्यकर्तीला तुम्हाला तिकीट फायनल होईल, असे हसत सांगितले. त्यावर त्या महिलेनेदेखील तितक्याच मिश्कीलपणे इतके वर्षे तिकीट मिळाले नाही आता काय मिळणार, आता तर फक्त वरचेच तिकीट मिळायचे बाकी आहे, असे सांगताच हंशा पिकला. परंतु पक्षातील निष्ठावानांची अवस्थादेखील उघड झाली.