नाथपंथीय गोसावी समाजाचा उद्या गुणगौरव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 19:54 IST2019-06-15T19:53:17+5:302019-06-15T19:54:39+5:30

नाशिक : नाथपंथी गोसावी समाज विकास मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंडळाचे अध्यक्ष संतोष नाथ यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि.१६) यशवंत लान्स, औरंगाबादरोड येथे आयोजित केली आहे.

Tomorrow's Gongavi Sawal of Nathantanti Gosavi Community | नाथपंथीय गोसावी समाजाचा उद्या गुणगौरव सोहळा

नाथपंथीय गोसावी समाजाचा उद्या गुणगौरव सोहळा

ठळक मुद्देमोफत नेत्र तपासणी शिबिर व विविध नेत्ररोगांवर उपचारासंदर्भात मार्गदर्शन

नाशिक : नाथपंथी गोसावी समाज विकास मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंडळाचे अध्यक्ष संतोष नाथ यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि.१६) यशवंत लान्स, औरंगाबादरोड येथे आयोजित केली आहे.
सकाळी १०.३० वाजता आयोजित या कार्यक्रमात दहावी, बारावी, डिप्लोमा, डिग्री व इतर क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व समाजातील मान्यवर व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्र म तसेच वटपौर्णिमेनिमित्त महिलांसाठी पारंपारिक वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
कार्यक्र मास समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नाथपंथीय गोसावी समाज विकास मंडळाच्या कार्यकारिणी मंडळाने केले आहे. तसेच यावेळी मोफत नेत्र तपासणी शिबिर व विविध नेत्ररोगांवर उपचारासंदर्भात मार्गदर्शन आणि पुढील उपचार अत्यल्प दरात करण्यात येणार आहे.

Web Title: Tomorrow's Gongavi Sawal of Nathantanti Gosavi Community