सर्वपक्षीयांतर्फे टोलबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:37 IST2018-08-23T00:36:49+5:302018-08-23T00:37:32+5:30

इगतपुरी : येथील मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर साई कुटीरसमोर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नांदगाव सदो येथील युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याचा आरोप करत तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व नांदगाव सदो येथील ग्रामस्थांनी घोटी टोल नाक्यावर आंदोलन करीत मध्यरात्री १२ पासून टोलनाका बंद पाडला.

Tollband Movement by All Parties | सर्वपक्षीयांतर्फे टोलबंद आंदोलन

सर्वपक्षीयांतर्फे टोलबंद आंदोलन

ठळक मुद्देग्रामस्थ आक्रमक : महामार्गावरील खड्ड्यांमुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप

इगतपुरी : येथील मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर साई कुटीरसमोर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नांदगाव सदो येथील युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याचा आरोप करत तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व नांदगाव सदो येथील ग्रामस्थांनी घोटी टोल नाक्यावर आंदोलन करीत मध्यरात्री १२ पासून टोलनाका बंद पाडला.
मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सÞुमारास नांदगाव सदो येथील शिवशक्ती युवक मंडळाचे कार्यकर्ते पंढरीनाथ सुखदेव भागडे (२३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मोटारसायकलने (एमएच १५ एफपी ३०४१) घरी जात असताना बोरटेंभे गावाजवळ साई कुटीरसमोर खड्ड्यात गाडीचे पुढील चाक गेल्याने ते रस्त्यात पडले. दरम्यान मागून येणारी पिकअप (एमएच ०४ जेके ६२५२) थेट त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही बातमी समजताच इगतपुरी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे व संदीप किर्वे यांच्या नेतृत्वाखाली आगरी समाज व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी घोटी टोल नाक्याजवळ जमून आंदोलन सुरू केले. मध्यरात्री १२ पासून वाहनधारकांकडून टोल आकारणी बंद करत टोलनाका बंद केला.
सकाळी ११ वाजता टोल प्रशासनाने महामार्गावरील सर्व खड्डे त्वरित बुजवून पंढरीनाथ भागडे यांच्या वारसांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर बुधवारी दुपारी १२ वाजेनंतर टोल सुरू करण्यात आला. याप्रसंगी उपअधीक्षक अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव आदी उपस्थित होते. या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकारी, इगतपुरी तालुका खरेदी-विक्र ी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे, संदीप किर्वे, भागीरथ मराडे, मूलचंद भगत, प्रशांत कडू, रामदास आडोळे, भोलेनाथ चव्हाण, अ‍ॅड. हनुमंत मराडे, देवीदास आडोळे, कैलास भगत, योगेश भागडे, मनीष भगत, नामदेव भागडे, शंकर भगत, दशरथ भागडे, विठ्ठल लंगडे यांच्यासह तालुक्यातील आगरी समाज सहभागी झाला होता. पंढरीनाथ भागडे अपघाती निधनामुळे नांदगाव सदो गावावर शोककळा पसरली आहे.

मुंबई - आग्रा महामार्गावर अनेक ठिकाणी दीड ते दोन फूट खोल खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रोज अपघात होऊन अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे.
- संदीप किर्वे घोटी.

येथील टोल नाक्यावर वाहनधारकांकडून दररोज लाखो रुपये टोल आकारणीत होते. मात्र महामार्गावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष दिले जात नाही. सदर खड्डे न बुजवल्यास महामार्ग बंद आंदोलन करू.
- प्रशांत कडू.

Web Title: Tollband Movement by All Parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक