शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
4
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
5
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
6
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
7
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
8
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
9
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
10
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
11
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

बंजारा समाजाचे आराध्य दैवत  सतीमाता-सामतदादाचा आजपासून यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:25 AM

वैशिष्ट्यपूर्ण परंपरा व रूढी जपणाºया देशभरातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वडांगळी येथील सतीमाता व सामतदादा यात्रोत्सवास मंगळवार (दि. ३०) पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, यात्रेला प्रारंभ होण्यापूर्वीच शंभरहून अधिक बोकडांचा बळी देत बंजारा भाविकांनी नवसपूर्तीस प्रारंभ केला आहे.

वडांगळी : वैशिष्ट्यपूर्ण परंपरा व रूढी जपणाºया देशभरातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वडांगळी येथील सतीमाता व सामतदादा यात्रोत्सवास मंगळवार (दि. ३०) पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, यात्रेला प्रारंभ होण्यापूर्वीच शंभरहून अधिक बोकडांचा बळी देत बंजारा भाविकांनी नवसपूर्तीस प्रारंभ केला आहे.  प्रतिवर्षी माघ पौर्णिमेस होणाºया यात्रेच्या निमित्ताने येथे बंजारा समाजाचा जणू कुंभमेळाच भरत असतो. या समाजातील महिला व पुरुषांनी काळाच्या ओघात आपली पारंपरिक वेशभूषा बाजूला सारल्याचे दिसत असले तरी आपल्या रूढी, प्रथा व परंपरा मात्र जोपासल्या आहेत.  धोतर अथवा चोळणा, अंगरखा आणि डोक्यावर लाल रंगाचे पागोटे असा या बंजारा समाजातील पुरुषांचा पूर्वीचा पेहराव असे, तर लाल रंगाचा घागरा, चोळी, कशिदा, कवड्या व आरशांच्या तुकड्यांनी सजविलेली भडक ओढणी, हातात हस्तीदंती कडे, शिंंगांच्या व पितळेच्या बांगड्या असा महिलांचा पोशाख मोठ्या प्रमाणावर दिसायचा. तथापि, कालपरत्वे राहणीमानात बदल दिसत असून, पुरुष इतरांसारखे शर्ट-पॅन्ट, तर स्त्रिया सहावारी साड्या परिधान करू लागल्या आहेत.या समाजाकडून पूर्वी ऊसतोडणीची कामे मोठ्या प्रमाणावर केली जात. मात्र शैक्षणिक सुविधा सर्वत्र उपलब्ध झाल्याने अनेकजण उच्चशिक्षण घेऊन नोकरी-व्यवसाय करू लागल्याचेही आढळून येते. प्रथमश्रेणी अधिकारी म्हणून काहीजण कार्यरत आहेत. इतकेच नव्हे तर राजकीय क्षेत्रातही यांनी आपला ठसा उमटविला आहे. कै. वसंतराव फुलसिंग नाईक, कै. सुधाकरराव नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविले. विद्यमान महसूल राज्यमंत्री संजय राठोड हेही याच समाजाचे आहेत. गळीत हंगामात ऊसतोडणीसाठी आजही ग्रामीण भागात या समाजाचे तांडे मोठ्या संख्येने काम करताना आढळतात. प्रवासाची साधने कमी असल्यापासून बंजारा भाविक विदर्भ-मराठवाड्यातून बैलगाड्यांत बसून शेकडो मैलांचा प्रवास करीत यात्रेसाठी येत असत. मात्र आर्थिक स्थिती उंचावलेले बंजारा बांधव बदलत्या काळात स्वत:च्या वातानुकूलित वाहनातून यात्रेसाठी येतात. राहणीमानात बदल झाला.  यात्रा काळात उघड्यावर बोकडबळी देण्यावर बंदी घालण्यात आल्यामुळे ट्रस्टच्या वतीने स्वतंत्र वधगृह बांधण्यात आले आहे. यामुळे उघड्यावरील बोकडबळीला आळा बसला आहे. उघड्यावर होणाºया बोकडबळींना मज्जाव केल्याने ते वधगृहात होत आहेत. दरम्यान, यात्रा सुरू होण्यापूर्वी गेल्या आठवडाभरात भाविकांनी नवसपूर्तीसाठी सुमारे शंभरहून अधिक बोकडांचा बळी दिला आहे. आज गर्दी वाढणार माघ पौर्णिमेस मंगळवारी रात्री १० वाजून २३ मिनिटांनी प्रारंभ होणार आहे. तथापि, मंगळवार हा देवीचा वार असल्याने मंगळवारी गर्दी होण्याची अपेक्षा आहे. बुधवारी चंद्रग्रहण आहे. त्यामुळे मंगळवारीच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  यात्रेस मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून सोमवारपासून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. १०८ क्रमांकाची एक रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात्रा निर्विघ्न पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व सतीमाता-सामतदादा देवस्थानने जय्यत तयारी केली आहे. दोन्ही मंदिरांस आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली आहे. मेवा, मिठाई, उपाहारगृहे व खेळण्याच्या दुकानांसह रहाटपाळणे, मौत का कुॅँवा, ब्रेक डान्स आदी मनोरंजनाची साधनेही दाखल झाली आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक