आज लोकमत ‘दीपोत्सव’ची मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 00:22 IST2019-10-24T00:20:52+5:302019-10-24T00:22:28+5:30
संपादन, मांडणी, छपाईची पारंपरिक रिंगणे भेदून दरवर्षी नवनवे प्रयोग करणारा आणि मराठी प्रकाशनविश्वाला एरवी दुर्लभ असलेली ‘लाखाची गोष्ट’ प्रत्यक्षात उतरवण्यात यशस्वी ठरलेला ‘दीपोत्सव’ हा लोकमत वृत्तसमूहाचा बहुचर्चित दिवाळी अंक सर्वत्र उपलब्ध झाला असून, या अंकाच्या निमित्ताने नाशिकमध्ये एका विशेष प्रकाशन-मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.

आज लोकमत ‘दीपोत्सव’ची मैफल
नाशिक : संपादन, मांडणी, छपाईची पारंपरिक रिंगणे भेदून दरवर्षी नवनवे प्रयोग करणारा आणि मराठी प्रकाशनविश्वाला एरवी दुर्लभ असलेली ‘लाखाची गोष्ट’ प्रत्यक्षात उतरवण्यात यशस्वी ठरलेला ‘दीपोत्सव’ हा लोकमत वृत्तसमूहाचा बहुचर्चित दिवाळी अंक सर्वत्र उपलब्ध झाला असून, या अंकाच्या निमित्ताने नाशिकमध्ये एका विशेष प्रकाशन-मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
‘अंक नव्हे, उत्सव’ असे बिरुद असलेल्या ‘दीपोत्सव’च्या प्रकाशनासाठी मराठी साहित्य-कला क्षेत्रातल्या मान्यवर निमंत्रितांसोबतच लेखक-दिग्दर्शक सचिन कुंडलकर आणि वैभव तत्त्ववादी उपस्थित राहणार आहेत. यावर्षी साडेतीन लाख प्रतींच्या विक्रमी खपाकडे झेप घेत असलेल्या ‘दीपोत्सव’मधल्या एका विशेष लेखाच्या निमित्ताने गप्पांचे हे सत्र होईल.
या खुल्या गप्पांची मैफल गुरुवारी (दि. २४) सायंकाळी सहा वाजता विशाखा सभागृह, कुसुमाग्रज स्मारक इथे होईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नाशिककर रसिकांना या कार्यक्रमासाठी अगत्याचे आमंत्रण आहे.
स्मार्टफोनवर सिनेमा
शूट होतो तेव्हा...
‘पॉॅॅण्डिचेरी’ हा (कदाचित भारतातला पहिलाच) मराठी सिनेमा नुकताच स्मार्टफोनवर शूट झाला. त्या अनुभवाविषयी सचिन कुंडलकर यांनी यावर्षीच्या ‘दीपोत्सव’मध्ये लिहिले आहे. तो सगळा प्रवास ‘दीपोत्सव’च्या मंचावर उलगडण्यासाठी सचिनच्या बरोबरीने वैभव तत्त्ववादी उपस्थित असतील.