शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

धर्मशाळेत आजपासून होणार स्थलांतर

By admin | Updated: August 3, 2014 01:57 IST

धर्मशाळेत आजपासून होणार स्थलांतर

 

नाशिक : काझीची गढी येथील रहिवाशांचे गाडगे महाराज धर्मशाळेत स्थलांतर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गाडगे महाराज धर्मशाळेत खोल्या उपलब्ध करून देण्यासंदर्भात महापौर अ‍ॅड. यतिन वाघ आणि आमदार वसंत गिते यांनी बैठक घेतली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनीही गाडगे महाराज धर्मशाळेच्या सर्व खोल्या तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहीत करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे रविवारपासून रहिवासी या धर्मशाळेत स्थलांतरित होतील.पावसामुळे गढीचा भाग दिवसेंदिवस खचत असून, त्यामुळे येथील सुमारे ८० ते ९० कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यांना स्थलांतरासाठी शासकीय यंत्रणेने राजी केले असले तरी प्रत्यक्षात स्थलांतर झालेच नाही. धर्मशाळेत जागा उपलब्ध नसल्याचा दावा संबंधित विश्वस्तांनी केला. त्यामुळे स्थलांतरासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला. महापौर अ‍ॅड. यतिन वाघ तसेच आमदार वसंत गिते यांनी अधिकारी आणि विश्वस्तांची बैठक घेतली त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन धर्मशाळेत किती खोल्या रिकाम्या आहेत, याची माहिती घेतल्यानंतर तेथे गढीवरील कुटुंबांना स्थलांतरित करण्याचे ठरविण्यात आले. धर्मशाळेखेरीज याच ठिकाणी बंद अवस्थेत असलेली महापालिकेची शाळा आणि रुग्णालय येथे देखील रहिवाशांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे महापौर वाघ यांनी सांगितले.दरम्यान, महापौर अ‍ॅड. वाघ यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून धर्मशाळा तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहीत करण्याची मागणी केली. त्यानुसार आपत्कालीन उपाययोजनेचा एक भाग म्हणून धर्मशाळेच्या खोल्या अधिग्रहीत करण्याची विनंती करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)