उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 12:04 AM2020-12-30T00:04:40+5:302020-12-30T00:06:08+5:30

नाशिक: जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका बिनवरोध करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी ३९०२ इतके अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जांची संख्या ४,९९२ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींमधील ५,८९५ जागांसाठी निवडणूक होत आहे.

Today is the last day to file nomination papers | उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस

Next
ठळक मुद्देतीन हजार अर्ज दाखल : शेवटच्या दिवशी उडणार झुंबड

नाशिक: जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका बिनवरोध करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी ३९०२ इतके अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जांची संख्या ४,९९२ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींमधील ५,८९५ जागांसाठी निवडणूक होत आहे.

शासकीय कार्यालयांना सलग तीन दिवस सुटी असल्याने अर्ज दाखल होण्याची संख्या कमी होती. कार्यालये सुरू होताच ८७३ अर्जांची आनलॉइन प्रीट आऊट इच्छुकांनी निवडणूक शाखेत जमा केली. मंगळवारी तीन हजारापर्यंत अर्जांची संख्या पोहोचली असून अखेरच्या दिवशी आणखी तीन हजार अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा ग्रामपंचायत निवडणुकीचा ज्वर वाढत असून पक्षीय राजकारणाच्या हालचालीदेखील गतिमान झाल्या आहेत. जिल्ह्यातही सरपंच, उपसरपंचदासाठी लिलावाद्वारे बोली लागत असल्याने साऱ्यांचे ग्रामपंचायत निवडणुकीकडे लक्ष वेधले गेले आहे.
दिंडारीतून ४८९, निफाडमधून ६१७, सिन्नरमधून ३३७, येवला येथून ४४५, मालेगावातून ६९९, नांदगाव २०३, चांदवड ३२४, कळवण १९७, बागलाण २८२, तर देवळा येथून २८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

त्र्यंबकेश्वरमधून केवळ ११ अर्ज
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची धामधूम सुरू असताना त्र्यंबकेश्वरमधील तीन ग्रामपंचायतींसाठी अवघे ११ अर्ज दाखल झाले आहेत. गेल्या सोमवारी तीन अर्ज दाखल झाले होते तर मंगळवारी ८ याप्रमाणे ११ अर्ज दाखल झाले आहेत. त्या खालोखाल देवळा येथून २८ तर इगतपुरीतून ३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

Web Title: Today is the last day to file nomination papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.