शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या परिसरात हिंदू महासंघाकडून शुद्धीकरण; तात्काळ कारवाई करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 11:58 AM

त्र्यंबकेश्वरमध्ये आज विविध हिंदू संघटांनी एकत्र येऊन सदर घटनेचा संताप व्यक्त केला.

त्र्यंबकेश्वर येथील ज्योर्तिलिंग त्र्यंबकराजाच्या मंदिरात प्रवेशासाठी एक विशिष्ट जमाव मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या कथित घटना समोर आली होती. ज्योर्तिलिंग त्र्यंबकराजाच्या मंदिरात हिंदू धर्मीयांव्यतिरिक्त अन्य कुणालाही प्रवेश नसताना गेल्या शनिवारी रात्री अन्य धर्मीयांच्या एका जमावाने मंदिरात घुसखोरीचा केलेला प्रयत्न देवस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. 

त्र्यंबकेश्वरमध्ये आज विविध हिंदू संघटांनी एकत्र येऊन सदर घटनेचा संताप व्यक्त केला. काही विशिष्ट धर्मातील लोकांनी त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला, त्याच्या निषेधार्थ हिंदु महासंघासह इतर हिंदू संघटनेनं आज एकत्र येत त्र्यंबकेश्वरच्या परिसरात आंदोलन केले. तसेच मंदिर परिसरात गोमूत्र शिंपडत हिंदू महासंघाकडून शुद्धीकरणही करण्यात आले. त्याचप्रमाणे संबंधित व्यक्तींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील हिंदू महासंघाकडून यावेळी करण्यात आली.

कथित घटनेची विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दिले आहेत. अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत ही एसआयटी असेल. याप्रकरणी एफआयआर नोंदवून कारवाईचे आदेशही फडणवीस यांनी दिले. एसआयटी गेल्या वर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, ज्यावेळी एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वरमंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची कथित घटना घडली होती. 

दरम्यान, ज्योर्तिलिंग त्र्यंबकराजाच्या मंदिरात हिंदू धर्मीयांव्यतिरिक्त अन्य कुणालाही प्रवेश नसताना १३ मे रोजी रात्री अन्य धर्मीयांच्या एका जमावाने मिरवणुकीद्वारे जाऊन मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले, असे हे कथित प्रकरण आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तातडीने सदर मिरवणूक थांबवत चौकशी केली. देवस्थान ट्रस्टच्या सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी केली होती.

घुसखोरीप्रकरणी गुन्हा दाखल

त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर त्र्यंबकेश्वर देवस्थानचे जनसंपर्क अधिकारी रवी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकील सय्यद व इतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम २९५,५११ नुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. त्र्यंबकेश्वरमधील प्रकाराचा अनेक हिंदू संघटनांनी निषेध करून गुन्हेगारांवर कारवाईची मागणी केली. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरNashikनाशिकPoliceपोलिस