घरोघरी आज मेजवानी ‘कांदे नवमी’ची...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 00:43 IST2020-06-29T00:42:22+5:302020-06-29T00:43:00+5:30
चातुर्मासाला प्रारंभ होण्यापूर्वीची नवमी म्हणजे कांदेनवमी. कांदेपोहे, कांद्याची साधी भजी, कांद्याची खेकडा भजी, कांद्याचा झणझणीत झुणका, कांद्याची पीठ पेरलेली भाजी, कांद्याचे थालीपीठ, कांद्याची चटणी अशा नानाविध प्रकारांची चटकदार मेजवानी सोमवारी रंगणार आहे.

घरोघरी आज मेजवानी ‘कांदे नवमी’ची...
नाशिक : चातुर्मासाला प्रारंभ होण्यापूर्वीची नवमी म्हणजे कांदेनवमी. कांदेपोहे, कांद्याची साधी भजी, कांद्याची खेकडा भजी, कांद्याचा झणझणीत झुणका, कांद्याची पीठ पेरलेली भाजी, कांद्याचे थालीपीठ, कांद्याची चटणी अशा नानाविध प्रकारांची चटकदार मेजवानी सोमवारी रंगणार
आहे.
अनेक पारंपरिक प्रथांचे पालन करणाऱ्या घरांमध्ये अद्यापही चातुर्मासादरम्यान कांदा पूर्णपणे वर्ज्य केला जातो, अशा घरांमध्ये सोमवारी कांद्याचा मनसोक्त आस्वाद घेतला जाणार आहे.
पावसासमवेत कांदाभजीची लज्जत
सध्याच्या युवा ते पन्नाशीपर्यंतच्या पिढीला कांदेनवमीचे महात्म्य आणि परंपरांचे अजिबात कौतुक नाही. मात्र, साठीवरील काळातील पिढी अद्यापही त्या परंपरांचे पालन करते. परंतु, एकीकडे मुसळधार पाऊस पडत असताना दुसरीकडे कांद्याची गरमागरम भजी कुणाला आवडत नाहीत. त्यामुळे परंपरा म्हणून मान्य नसले तरी पावसाळ्याच्या या प्रारंभीच्या काळात कांद्याच्या गरमागरम आणि कुरकुरीत खेकडा भजीची लज्जत मात्र प्रत्येकाच्याच रसनेला मोहात पाडते.