आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 01:39 IST2021-04-13T23:29:53+5:302021-04-14T01:39:14+5:30

नाशिक : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती बुधवारी (दि.१४) शहरात साधेपणाने साजरी केली जाणार आहे.

Today Dr. Babasaheb Ambedkar Jayanti | आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

ठळक मुद्देशहरातील शिवाजी रोडवरील पुतळ्यास विद्युत रोषणाई

नाशिक : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती बुधवारी (दि.१४) शहरात साधेपणाने साजरी केली जाणार आहे.

उत्सवावर यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे जयंती साधेपणाने साजरी करावी, असे अवाहन ज्येष्ठ समाजबांधवांनी केले असून, त्यानुसार जयंती साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय जयंती उत्सव मंडळांनी घेतला आहे. असे असले तरी शहरात फलकबाजीतून जयंतीचा उत्साह असल्याचे दिसून येते.

भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बुधवारी साजरी होत आहे. यानिमित्ताने अवघे शहर निळेमय झाले असून प्रमुख चौक आणि रस्त्यावर डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करणारे भलेमोठे फलक, बॅनर्स लावण्यात आलेले आहे. रिक्षा आणि दुचाकींना निळे ध्वज लावले असल्याचेही दिसून येते.

शहरातील शिवाजी रोडवरील पुतळ्यास विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे नाशिकरोड रेल्वेस्थानकासमोरील पुतळ्यासदेखील सजविण्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांनी फलकाच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.

Web Title: Today Dr. Babasaheb Ambedkar Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.