मनसेच्या नगरसेवकांची आज राज घेणार झाडाझडती

By Admin | Updated: May 9, 2014 23:28 IST2014-05-09T23:01:51+5:302014-05-09T23:28:55+5:30

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी अचानक नाशिक मुक्कामी दाखल झाले आहेत. शनिवारी सकाळी दहा वाजता पक्षाच्या नगरसेवकांना राजगड येथे बैठकीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेच्या पालिकेतील कामगिरीवर उपस्थित झालेले प्रश्न आणि फाटाफुटीच्या चर्चेने राज ठाकरे संतप्त झाल्याचे सांगितले जात असून, शनिवारी त्यामुळेच नगरसेवकांची झाडाझडती घेतली जाण्याची शक्यता आहे.

Today, the corporators of MNS will get the rule of Jharkhand | मनसेच्या नगरसेवकांची आज राज घेणार झाडाझडती

मनसेच्या नगरसेवकांची आज राज घेणार झाडाझडती

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी अचानक नाशिक मुक्कामी दाखल झाले आहेत. शनिवारी सकाळी दहा वाजता पक्षाच्या नगरसेवकांना राजगड येथे बैठकीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेच्या पालिकेतील कामगिरीवर उपस्थित झालेले प्रश्न आणि फाटाफुटीच्या चर्चेने राज ठाकरे संतप्त झाल्याचे सांगितले जात असून, शनिवारी त्यामुळेच नगरसेवकांची झाडाझडती घेतली जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेत अपेक्षित कामगिरी मनसेने केली नाही, अशा टीका वारंवार होत राहिल्या. लोकसभा निवडणुकीत हा विषय विरोधकांनी उपस्थित केला. नाशिकच नव्हे तर अन्य ठिकाणी मनसेची महापालिकेतील कामगिरी हा विषय चर्चेत राहिला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची अडचण झाली. त्यातच लोकसभा निवडणुकीत मनसेत फाटाफूट होऊन काहींनी महायुती, तर काहींनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारासाठी प्रयत्न केल्याची चर्चा शहरात असून, तीही राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा मनसेच्या नगरसेवकांमध्ये आहे. शनिवारी सकाळी १० वाजता नगरसेवकांना राजगड येथे बोलावण्यात आले असून, यावेळी झाडाझडती घेतली जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Today, the corporators of MNS will get the rule of Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.