नाशकात आज 912 नवे रुग्ण, 10 बळी; 412 रुग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 21:10 IST2020-08-22T21:10:47+5:302020-08-22T21:10:57+5:30
ग्रामीण भागात 252 तर मालेगावात 29 आणि जिल्ह्यबाहेरील 2 रुग्ण आढळून आले.

नाशकात आज 912 नवे रुग्ण, 10 बळी; 412 रुग्णांची कोरोनावर मात
नाशिक: जिल्ह्यात शनिवारी(दि.22) एकूण 412 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. जिल्ह्यात एकूण 912 नवे रुग्ण आढळून आले. यामुळे आता जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 29 हजार 335 इतकी झाली आहे.. दिवसभरात उपचारार्थ दाखल 10 रुग्ण दगावले. यामुळे मृतांचा एकूण आकडा आता 761वर पोहचला. शनिवारी नाशिक शहरात एकूण 629 रुग्ण आढळून आले. एका दिवसात 136 रुग्णांची वाढ झाली.
जिल्ह्यात ग्रामीण भागात 252 तर मालेगावात 29 आणि जिल्ह्यबाहेरील 2 रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात अद्याप 23 हजार 777 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 4 हजार 797 रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. मनपा नाशिक हद्दीत शनिवारी 531 संशयित तर ग्रामीण भागात 282 संशयित रुग्ण आढळून आले.
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नाशिककरांना अधिकाधिक खबरदारी घेत शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. आगामी काळ सण-उत्सवांचा असल्याने संक्रमणाचा धोका अधिक वाढण्याची श्यक्यता आहे. आगामी गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे.
शहरातील बाजारपेठेत नागरिकांची विविध पुजासाहित्य व गणेशमूर्ती खरेदीसाठी गर्दी उसळली होती. यावेळी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी तोंडावर मास्क लावत परस्परांत 'डिस्टन्स' बाळगणे खूप गरजेचे आहे. जिल्ह्यातील १ हजार ३५७ अहवाल अद्याप प्रलंबित आहे.