शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
2
Top Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
3
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
4
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
5
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
6
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
7
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
8
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
9
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
10
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
11
हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
12
एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 
13
पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
14
आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…” 
15
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
16
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?
17
भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
18
Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!
19
नाशिकमध्ये हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग; जेष्ठ व्यक्तीच्या टॅबमधील 'त्या' अश्लील व्हिडिओसाठी १२ लाखांची खंडणी
20
Ashok Kharat : "कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

कंगनाची भेट घ्यायला वेळ, मग कांदा उत्पादकांनाही भेटा, शेतकऱ्यांची राज्यपालांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 12:43 IST

या संदर्भात शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.  

नाशिकः ज्या प्रमाणे कंगनाची भेट घेतलात, त्याप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचीही भेट घ्या, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी संवेदनशील मनाचे आहेत. न्यायासाठी दाद मागणाऱ्यास ते नक्की भेट देतात, असं शेतकरी संघर्ष संघटनेने म्हटलं आहे.  संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले यांनी यासंदर्भात निवेदन आणि सोशल मीडियातील एका व्हिडीओद्वारे आवाहन केले. १४ सप्टेंबरला अचानक केंद्राने कांदा निर्यातबंदीची भूमिका घेतली. या संदर्भात शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.  गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी एका सैनिकास भेट दिली होती. इतकेच नव्हे तर प्रसिद्ध सिनेतारका कंगना राणौत हिचे मुंबईतील कार्यालय पालिकेने तोडल्याच्या तक्रारीवर तिलाही भेटले होते. इथे कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाने तर राज्यात लाखो शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत, या शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे राज्यपाल मध्यस्थी करून शुक्रवारी आम्हाला ते नक्कीच भेट देतील’, अशा शब्दात शेतकरी संघर्ष संघटनेने कांदाप्रश्नी राज्यपालांच्या भेटीची मागणी केली आहे.सरकारने स्वत:च बनविलेल्या नियमनमुक्तीच्या कायद्यास कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाने फाटा दिला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष असल्याचंही त्यांनी सांगितलं.  अन्यायाची भावना असलेले अनेक लोक राज्यपाल महोदयांची भेट घेतात. राज्यपालदेखील संवेदनशील मनाचे आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना भेटी देऊन त्यांनी त्यांच्या अन्याय सोडवण्यासाठी प्रयत्नही केले आहेत, असंही वडघुले म्हणाले आहेत. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी