शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 00:48 IST

नाशिकरोड : नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावात १५ ते १६ तमाशा मालक व त्यांच्या कलाकारांचे वास्तव्य असून, गेल्या चार वर्षांपासून नोटाबंदी, कोरडा दुष्काळ, निवडणूक आचारसंहिता व यंदाच्या कोरोनामुळे अर्थचक्र पूर्णपणे कोलमडून गेले आहे.

मनोज मालपाणी ।नाशिकरोड : नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावात १५ ते १६ तमाशा मालक व त्यांच्या कलाकारांचे वास्तव्य असून, गेल्या चार वर्षांपासून नोटाबंदी, कोरडा दुष्काळ, निवडणूक आचारसंहिता व यंदाच्या कोरोनामुळे अर्थचक्र पूर्णपणे कोलमडून गेले आहे. गुढीपाडवा ते बुद्ध पौर्णिमेच्या काळातील ऐन हंगामात तमाशाच्या सुपाऱ्या रद्द करत अ‍ॅडव्हान्स परत करावा लागल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या लोककलावंतांना आर्थिक हातभार दिला नाही, तर लोककला व कलाकार यापासून दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गेल्या २० ते २२ वर्षांपासून पंधरा ते सोळा तमाशाचे मालक आपल्या कलाकारांसह राहतात. हंगामी तमाशा मालक संबंधित गावाच्या पंचकमिटी अथवा पदाधिकाऱ्यांकडून तमाशाची सुपारी, बिदागी घेतल्यानंतर त्या त्या गावाच्या यात्रेत आपला तमाशाचा फड घेऊन जातात. साधारणत: जिल्ह्यात आॅक्टोबर ते फेब्रुवारी या दरम्यान गावोगावी विविध देवीदेवतांच्या नावे यात्रा भरतात. तर नगर, पुणे जिल्ह्यात फेब्रुवारी ते जून या कालावधीपर्यंत यात्रा होतात. या काळात तमाशा फडचालकांचा व्यवसाय तेजीत असतो. मात्र गेल्या तीन वर्षांपासून तमाशा मालक व कलाकार आर्थिक अडचणीत आले आहेत. तीन वर्षांपूर्वीची नोटाबंदी व नंतरच्या काळात कोरडा दुष्काळ, लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे अनेक गावांच्या यात्रांमध्ये तमाशाकडे पाठ फिरविण्यात आली. त्यामुळे फड चालविण्यासाठी घेतलेले कर्ज तमाशा फड मालकांना फेडता न आल्याने तसेच कलाकारांना योग्य आर्थिक मोबदला देणे शक्य होत नसल्याने चांगले कलाकार मिळणे अवघड झाले आहे. तमाशाच्या माध्यमातून दरवर्षी तमाशा फड मालक ५० ते ६० लाख रुपयांची उलाढाल करतो. यामध्ये प्रत्येक ठिकाणी तमाशाचा मंडप उभारणे, कलाकारांचे पगार, गाडीचे भाडे, खाण्या-पिण्याचा खर्च, जाहिरात, राहुटी उभी करून मॅनेजर नेमणे आदी कामांसाठी २५ ते ३० लाख रुपये दरवर्षी खर्च येतो.-----------------------------------कोरोनामुळे सर्वकाही धोक्यातहंगामी तमाशाचा मोठा सीझन गुढीपाडवा ते बुद्ध पौर्णिमेपर्यंत असतो. तमाशा बुकिंगसाठी नांदूरशिंगोटे व पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे लाखो रुपये खर्च करून राहुटी केली जाते. गावागावात बॅनर लावून जाहिरातबाजी तसेच मॅनेजर नेमणे आदी कामे केली जातात. त्यानंतर कलाकारांना गोळा करून रंगीत तालीम केली जाते. यंदा होळीपासून या हंगामी तमाशा मालकांनी गावाच्या जत्रेतील तमाशाच्या मालकाने सुपारी घेऊन तालीम करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये तमाशा मालकाने स्वत:चे व कर्ज घेऊन लाखो रुपये गुंतवणूक केली होती. मात्र गुढीपाडव्याच्या चार-पाच दिवस अगोदर कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करून सार्वजनिक कार्यक्रमांना शासनाने बंदी घातली. यामुळे सर्व जत्रा रद्द करण्यात आल्याने तमाशा मालकांना घेतलेल्या अ‍ॅडव्हान्स पुन्हा परत द्यावा लागला. तसेच लॉकडाऊनमुळे इतर जिल्ह्यांतील कलाकार व कामगारांना त्यांच्या गावी जाऊ देण्यात आले.--------------------...तरीदेखील करतआहे नि:स्पृह सेवातमाशा मालक, कलाकार हे वेगवेगळ्या जिल्ह्यांतून एकत्र जमले असून, त्यांचा हंगाम लॉकडाऊनमध्ये गेल्याने त्यांच्यावर सर्व प्रकारच्या काटकसरीची वेळ आली आहे. नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत, काही ग्रामस्थ, दुकानदार, दानशूर नागरिक यांनी काही प्रमाणात त्यांना मदत केली आहे. अत्यंत हलाखीची परिस्थिती असतानासुद्धा त्यातील २५ तमासगीरांनी रक्तदान करून देशसेवेला हातभार लावला आहे. त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या, जिल्हा नाकाबंदी ठिकाणी असलेल्या पोलिसांना गेल्या दीड महिन्यापासून दररोज मोफत चहा-पाणी दिला जात आहे.-----------------------------तमाशामध्ये लोककलावंत आपली कला सादर करत उपस्थिताना बसविण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. मात्र गेल्या चार वर्षांपासून आलेल्या विविध अडचणींमुळे लोकांना हसवून आनंद देणाºया या बहुगुणी लोककलावंतांच्या चेहºयावर खरं-खोटं हसू, आनंद द्यायला तयार नाही. ही लोककला व कलाकार जिवंत ठेवण्यासाठी शासनासह सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा.- राजू बागुल, आम्रपाली पुणेकर तमाशा मंडळ----------------------------------आम्ही हातावरचे असलो तरी लोककलावंत आहोत. आम्ही कला सादर करून सर्वांना हसवून आनंदी करून चार पैसे कमवतो. पण आता अवघड परिस्थिती आहे. शासनाने मदत करण्याची गरज आहे.- उषा नारायणगावकर, कलाकार

टॅग्स :Nashikनाशिक