शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

यंदा बाप्पाची मूर्ती तीन फुटांपेक्षा मोठी नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 12:12 AM

यंदा कोरोना या महामारीचे भयावह संकट असल्यामुळे यावर्षी गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा केला जाणार आहे. तसेच गणरायाच्या प्रतिष्ठापना व अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावरसुध्दा विसर्जन मिरवणूक न काढण्याचा निर्णय निर्णय नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी शहर पोलीस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत घेतला गेला.

ठळक मुद्दे विसर्जन मिरवणूक रद्द : मुख्यमंत्री सहायता निधीला देणार मदतीचा हात

नाशिक : यंदा कोरोना या महामारीचे भयावह संकट असल्यामुळे यावर्षी गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा केला जाणार आहे. तसेच गणरायाच्या प्रतिष्ठापना व अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावरसुध्दा विसर्जन मिरवणूक न काढण्याचा निर्णय निर्णय नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी शहर पोलीस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत घेतला गेला.कोरोना आजारामुळे राज्याची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. तसेच कोरोना आजाराचे संक्र मण रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण गरजेचे आहे. यामुळे येत्या २२ आॅगस्ट रोजी गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे; मात्र शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत यंदा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. अनंत चतुर्दशीला कुठल्याहीप्रकारची मिरवणूक काढण्यात येणार नाही, असा निर्णय पोलीस आयुक्तालयात आयुक्त विश्वास नांगरे-पाटील व महानगर गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. सोमवारी (दि.६) सकाळी आयुक्तालयाच्या सभागृहात सर्व खबरादारी घेत महानगर गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती.या बैठकीला उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे, पौर्णिमा चौगुले, विजय खरात यांच्यासह इतर अधिकारी तसेच नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, गजानन शेलार, विनायक पांडे, प्रथमेश गिते, शंकर बर्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते.गणेशोत्सव मित्रमंडळांनी जास्तीत जास्त तीन फूट उंचीची गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यावर्षी मिरवणूक न काढण्याचा, गणेशोत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारे डिजे, ध्वनिक्षेपकाचा वापर पूर्णपणे टाळण्याचा निर्णय घेण्यात आला. अनंत चतुर्दशीची विसर्जन मिरवणूक रद्द; मुख्यमंत्री सहायता निधीला देणार मदतीचा हात या निर्णयाचे नांगरे-पाटील यांनी यावेळी स्वागत करत पोलीस प्रशासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चांगला कृती आराखडा तसेच आचारसंहिता तयार करावी. नाशिक शहराचा आदर्श संपूर्ण राज्यापुढे ठेवावा, असेही ते यावेळी म्हणाले. गणेशोत्सवादरम्यान विविध मंडळांकडून रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजनावर भर दिला जाणार आहे. तसेच कोरोनाबाबत समाजात जनजागृती करत सामाजिक बांधिलकी जोपासली जाईल, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम