पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टिलीमिली’ ; २० जुलैपासून उपक्रम दूरचित्र वाहिनीद्वारे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 06:00 PM2020-07-09T18:00:27+5:302020-07-09T18:03:45+5:30

राज्यातील शाळा महाविद्यालये संपूर्ण जून उलटूनही बंद असून, काही शाळांनी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू केली आहे. मात्र, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, स्मार्टफोन आणि इतर वेगवेगळ्या कारणांनी लाखो विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होताना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे पहिली ते आठवीच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरचित्र वाहिनीवर २० जुलैपासून दिले जाणार आहे.

‘Tillimili’ for students from 1st to 8th | पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टिलीमिली’ ; २० जुलैपासून उपक्रम दूरचित्र वाहिनीद्वारे शिक्षण

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टिलीमिली’ ; २० जुलैपासून उपक्रम दूरचित्र वाहिनीद्वारे शिक्षण

Next
ठळक मुद्दे २० जुलैपासून ‘टिलीमीली’ मालिकेद्वारे दिले शिक्षणपहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम पहिल्या सत्रातील अभ्यासक्रमाचा समावेश

नाशिक : कोरोनाचा फै लाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने राज्यातील शाळा महाविद्यालये संपूर्ण जून उलटूनही बंद असून, काही शाळांनी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू केली आहे. मात्र, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, स्मार्टफोन आणि इतर वेगवेगळ्या कारणांनी लाखो विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होताना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे पुण्यातील एमकेसीएलतर्फे  पहिली ते आठवीच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर २० जुलैपासून ‘टिलीमीली’ मालिकेद्वारे दिले जाणार असून, राज्यभरातील दीड कोटी विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार असल्याचा विश्वास राज्यातील शाळा, महाविद्यालये कोरोनाच्या वाढत्या संसगामुळे मार्च महिन्यापासून बंद आहे. शाळांच्या परीक्षाही रद्द करून विद्यार्थांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे जूनच्या मध्यावधीपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी यंदा कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू झालेल्या नाही. त्यामुळे पालकांना विद्यार्थांच्या शैक्षणिक भवितव्याची चिंता सतावू लागली आहे. काही खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित, विनाअनुदानित व स्वयंअथसहाय्य शाळांनी आॅनलाइन पद्धतीने वर्ग सुरू केले असून, विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. मात्र, ऑनलाइन वर्गांसाठी आवश्यक असलेली यंत्रणा सर्वच विद्यार्थ्यांकडे उपलब्ध नसल्याने काही विद्यार्थांचे नुकसान होत आहे, असे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मकेसीएलन शासनाच्या माध्यमातून पहिली ते आठवीच्या वर्गांसाठी पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवर मालिकेद्वारे देण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: ‘Tillimili’ for students from 1st to 8th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.