शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
4
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
5
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
6
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
7
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
9
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
10
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
11
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
12
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
13
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
14
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
15
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
16
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
17
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
18
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
19
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
20
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
Daily Top 2Weekly Top 5

भगवा फडकविण्याची जबाबदारी तिघांवर?

By admin | Updated: March 1, 2017 01:12 IST

नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजपाची जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी सुरू असलेली चर्चा पाहून शिवसेनेनेही आता सत्ता स्थापनेचे ‘शिवधनुष्य’ उचलण्याची जबाबदारी तिघा शिलेदारांवर सोपविल्याची चर्चा आहे.

नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजपाची जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी सुरू असलेली चर्चा पाहून शिवसेनेनेही आता सत्ता स्थापनेचे ‘शिवधनुष्य’ उचलण्याची जबाबदारी तिघा शिलेदारांवर सोपविल्याची चर्चा आहे. मंगळवारी (दि. २८) यासंदर्भात मातोश्रीवर खलबते झाल्याचे समजते. जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक २५ संख्याबळ असूनही भाजपा - राष्ट्रवादी यांची आघाडी झाल्यास शिवसेनेला विरोधी बाकावर बसण्याची वेळ येणार आहे. त्यामुळेच खडबडून जागे झालेल्या शिवसेनेने जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेच्या तीन वरिष्ठ नेत्यांनी मंगळवारी मुंबईत मातोश्रीवर जाऊन शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांना जिल्ह्यातील घडमोडींची माहिती देण्यात आल्याचे कळते. त्यातूनच मग जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी आवश्यक  ते निर्णय घेण्याची जबाबदारी या तिन्ही नेत्यांवर सोपविण्यात आल्याचे  कळते. शिवसेनेची भूमिका अद्याप स्पष्ट नसली तरी कॉँग्रेस किंवा राष्ट्रवादीला जोडीला घेऊन शिवसेना सत्ता स्थापन करू शकते. चार अपक्षांपैकी दोेन अपक्षांना गोंजरण्यास शिवसेनेने सुरुवात केल्याचे समजते. त्याचबरोबर भाजपासोबत माकपा जाणार नाही, हे गृहीत धरून माकपाच्या स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन प्रसंगी त्यांना सभापतिपद देऊन शिवसेना जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)गटनोंदणीचे अधिकार प्रवीण जाधव यांना शिवसेनेच्या नूतन जिल्हा परिषद सदस्यांची गटनोंदणी बुधवारी (दि.१) होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी दिली. गटनोेंदणी करण्यासाठी विद्यमान गटनेते प्रवीण जाधव यांना अधिकार देण्यात आल्याचे समजते. प्रवीण जाधव अनुभवी असल्याने गटनोंदणी करण्यासाठी शिवसेनेने जाधव यांना नेमल्याचे समजते. शिवसेनेच्या गटनेतेपदी माजी आमदार धनराज महाले यांची निवड केली जाणार असल्याचीही चर्चा आहे.