शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात नायलॉन मांजाने कापले १५० पक्ष्यांचे पंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 01:35 IST

निसर्गाचा अस्सल दागिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्ष्यांवर मागील पाच वर्षांपासून मोठी ‘संक्रांत’ ओढवत आहे. जानेवारीपासून संकटात सापडणारे पक्षी डिसेंबरपर्यंत शहरातील विविध भागातील वृक्षांवर तुटून पडलेल्या नायलॉन मांजामध्ये अडकून जायबंदी होण्याच्या घटना घडतात. २०१९ साली डिसेंबरअखेरपर्यंत १५० पक्ष्यांना ‘रेस्क्यू’ करण्यात मनपा अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले, मात्र यापैकी बहुतांश पक्षी जायबंदी झाले तर काहींचा मृत्यूही झाला. तसेच काही पक्ष्यांनी हवेत पुन्हा भरारीदेखील घेतली. वर्षभरात सुमारे ७० ते ८० पक्षी नायलॉन मांजामुळे जखमी होऊन मृत्युमुखी पडल्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देधक्कादायक : बहुसंख्य जायबंदी झालेले पक्षी पडले मृत्युमुखी; झाडावरील मांजात अडकून सर्वाधिक दुर्घटना

नाशिक : निसर्गाचा अस्सल दागिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्ष्यांवर मागील पाच वर्षांपासून मोठी ‘संक्रांत’ ओढवत आहे. जानेवारीपासून संकटात सापडणारे पक्षी डिसेंबरपर्यंत शहरातील विविध भागातील वृक्षांवर तुटून पडलेल्या नायलॉन मांजामध्ये अडकून जायबंदी होण्याच्या घटना घडतात. २०१९ साली डिसेंबरअखेरपर्यंत १५० पक्ष्यांना ‘रेस्क्यू’ करण्यात मनपा अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले, मात्र यापैकी बहुतांश पक्षी जायबंदी झाले तर काहींचा मृत्यूही झाला. तसेच काही पक्ष्यांनी हवेत पुन्हा भरारीदेखील घेतली. वर्षभरात सुमारे ७० ते ८० पक्षी नायलॉन मांजामुळे जखमी होऊन मृत्युमुखी पडल्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.मकरसंक्रांतीच्या औचित्यावर पतंगबाजीचा आनंद लुटला जातो. हा आनंद लुटताना नायलॉन मांजाचा वापर टाळला तर दुर्घटनादेखील कमी होण्यास मदत होईल, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. जिल्हा प्रशासन, वनविभाग, पोलीस प्रशासनाकडून सातत्याने यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नायलॉन मांजाचा वापर, विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. शहरातील काही पक्षीप्रेमींशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, दरवर्षी मकरसंक्रांतीनंतर जखमी पक्ष्यांचे रेस्क्यू कॉलची संख्या खूप वाढते. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही डिसेंबरपासूनच असे कॉल शहरातील पक्षीप्रेमींना येण्यास सुरुवात झाली होती. २०१८ साली सुमारे ७२ पक्ष्यांना जीव गमवावा लागला होता तर २०१९ साली जानेवारी ते डिसेंबरपर्यंत ८० पक्षी मृत्युमुखी पडल्याचा अंदाज आहे.२०१९ साली जायबंदी पक्षी४ कावळा - ४४४ कबुतर -४ घार - १७४ घुबड- ११४ बगळा- १७४ वटवाघुळ- ८४ करकोचा- ३४ साळुंखी- २४ कोकीळ- ३४ पोपट - २२०१९ मध्ये दरमहा जखमी पक्ष्यांची संख्याजानेवारी- २६४ फेब्रुवारी- १३४ मार्च- १३४ एप्रिल- ९४ मे-१६४ जून- १९४ जुलै- ७४ आॅगस्ट-५४ सप्टेंबर- ८४ आॅक्टोबर- ९४ नोव्हेंबर - ११४ डिसेंबर- १६

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य