विनयभंगप्रकरणी तीन वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:23 IST2018-02-16T00:22:32+5:302018-02-16T00:23:27+5:30
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते गावातील काशीनाथ सारुक्ते याने बालिकेला अश्लील छायाचित्रे दाखवून विनयभंग केल्याची घटना गेल्या वर्षी उघडकीस आली होती. याप्रकरणी जिल्हा न्यायालयात खटला सुरू होता. यात गुरुवारी सुनावणी होऊन न्यायालयाने काशीनाथ यास तीन वर्षांचा कारावास व पाच हजारांचा दंड ठोठावला.

विनयभंगप्रकरणी तीन वर्षांचा कारावास
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते गावातील काशीनाथ सारुक्ते याने बालिकेला अश्लील छायाचित्रे दाखवून विनयभंग केल्याची घटना गेल्या वर्षी उघडकीस आली होती. याप्रकरणी जिल्हा न्यायालयात खटला सुरू होता. यात गुरुवारी सुनावणी होऊन न्यायालयाने काशीनाथ यास तीन वर्षांचा कारावास व पाच हजारांचा दंड ठोठावला.
इगतपुरी पोलीस ठाण्यात काशीनाथविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. वही दाखविण्याच्या बहाण्याने त्याने पीडित बालिकेला स्वत:च्या घरी नेऊन अश्लील छायाचित्रांचे पुस्तक दाखवून विनयभंग केला होता. सदर प्रकार जेव्हा पीडित बालिकेने घरी आल्यावर आईला सांगितला तेव्हा ही घटना उघडकीस आली. आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. युक्तिवाद ऐकून घेत साक्षीदारांनी दिलेली साक्ष व पुराव्यांच्या आधारे तीन वर्षांच्या कारावासासह पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.