शहरातून तीन दुचाकींची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:12 IST2018-10-24T00:11:55+5:302018-10-24T00:12:13+5:30
शहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून म्हसरूळ, पंचवटी व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतून चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्या आहेत़ मखमलाबादच्या तांबे मळा परिसरातील रहिवासी ज्ञानेश्वर धनगर (बागुल) यांची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १५, एफसी ३६८०) चोरट्यांनी २० व २१ आॅक्टोबर रोजी घराजवळून चोरून नेली. याप्रकरणी दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

शहरातून तीन दुचाकींची चोरी
नाशिक : शहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून म्हसरूळ, पंचवटी व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतून चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्या आहेत़
मखमलाबादच्या तांबे मळा परिसरातील रहिवासी ज्ञानेश्वर धनगर (बागुल) यांची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १५, एफसी ३६८०) चोरट्यांनी २० व २१ आॅक्टोबर रोजी घराजवळून चोरून नेली. याप्रकरणी दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ जेलरोडच्या सातभाईनगरमधील रहिवासी जयंत पगारे यांची दहा हजार रुपये किमतीची टीव्हीएस स्ट्रीक दुचाकी (एमएच १५, डीआर २९७८) चोरट्यांनी १० आॅक्टोबर रोजी पंचवटीतील यशवंतराव महाराज पटांगणावरून चोरून नेली़ याप्रकरणी दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ द्वारकाजवळील बुºहानी हाउसमधील रहिवासी शब्बीर धुलियावाला यांची सीडी डिलक्स (एमएच १८ यू ६८९८) चोरट्यांनी १८ व १९ आॅक्टोबर रोजी द्वारका भागातील टाकळी रोडवर असलेल्या एका सोसायटीतून चोरून नेली़