दुकानांचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या तिघा संशयितांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 21:45 IST2018-10-27T21:45:20+5:302018-10-27T21:45:49+5:30

नाशिक : देवळाली कॅम्प परिसरातील किराणा दुकान व वाइन शॉप फोडून सुमारे ९१ हजार रुपयांची रोकड चोरणा-या तिघा संशयितांना देवळाली कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे़ सनी ऊर्फ प्रेम बाजीराव कदम (वय २२, रा. हाडोळा, आनंदरोड, देवळाली कॅम्प), मुज्जू ऊर्फ मुजफ्फर जराक खान (२२, रा. देवळाली कॅम्प) व शाहबाज जाकीर शेख (२१, रा. छत्रपती कॉलनी, विहितगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

 Three suspects arrested after stabbing shoppers and stolen | दुकानांचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या तिघा संशयितांना अटक

दुकानांचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या तिघा संशयितांना अटक

ठळक मुद्देअवघ्या आठ तासांत या तिघा संशयितांना अटक

नाशिक : देवळाली कॅम्प परिसरातील किराणा दुकान व वाइन शॉप फोडून सुमारे ९१ हजार रुपयांची रोकड चोरणा-या तिघा संशयितांना देवळाली कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे़ सनी ऊर्फ प्रेम बाजीराव कदम (वय २२, रा. हाडोळा, आनंदरोड, देवळाली कॅम्प), मुज्जू ऊर्फ मुजफ्फर जराक खान (२२, रा. देवळाली कॅम्प) व शाहबाज जाकीर शेख (२१, रा. छत्रपती कॉलनी, विहितगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

देवळाली कॅम्प येथील मुक्तिधामरोडवरील मन्नत वाइन शॉपचे शटर उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील २१ हजार रुपये चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.२६) रात्रीच्या सुमारास घडली होती़, तर याच दिवशी गरीब नवाज कॉम्प्लेक्समधील किराणा दुकानाचे शटर तोडून ७० हजारांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली होती़ पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे व देवळाली कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ए. आर. जाधव, कर्मचारी कृष्णा चव्हाण, विशाल सोळुंके, सुदाम झाडे, पंढरीनाथ अहेर यांनी अवघ्या आठ तासांत या तिघा संशयितांना अटक केली़

Web Title:  Three suspects arrested after stabbing shoppers and stolen