अपघातात एकाच कुटुंबातील तीन भावंडे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 23:37 IST2020-04-20T23:36:53+5:302020-04-20T23:37:08+5:30
पिंपळगाव बसवंत : परिसरातील शिरवाडे फाटा येथे ट्रॅक्टर व रुग्णवाहिकेत झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन भावंडे जागीच ठार झाले, ...

अपघातात एकाच कुटुंबातील तीन भावंडे ठार
पिंपळगाव बसवंत : परिसरातील शिरवाडे फाटा येथे ट्रॅक्टर व रुग्णवाहिकेत झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन भावंडे जागीच ठार झाले, तर रुग्णवाहिकाचालक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.२०) घडली.
शिरवाडे फाटा येथे रात्रीच्या सुमारास पाचोरा (जि. जळगाव) येथून रु ग्ण घेऊन नाशिकच्या दिशेने येत असलेली रुग्णवाहिका व समोरून विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात अजिजाबी मोईद्दिन बागवान (६०), रफिऊद्दीन मोईद्दिन बागवान (५५) व कमरूबी मोईनोद्दिन बागवान (६०) सर्व, रा. पाचोरा, बाहेरपुरा (जि. जळगाव) हे जागीच ठार झाले. तर रुग्णवाहिकाचालक सागर भिकन पाटील गंभीर जखमी झाला. त्यास पिंपळगाव येथील शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांचे पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नाशिक येथील त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.